Pune : अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Akshay Tritiya traffic Pune : अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १ मे रोजी सकाळी ७ ते रात्री १२ दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गांची माहिती पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे.
Pune Traffic News
Pune Traffic NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Dagdusheth Ganpati temple traffic diversion : अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या भागात PMPL बस आणि दुचाकी वाहनांना बुधवारी (१ मे २०२५) सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत प्रवेशबंदी असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे.

पुणे शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या परिसरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या काळात PMPL बस सेवा पर्यायी मार्गांवरून चालवली जाईल. वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सुस्पष्ट मार्गदर्शन जारी केले आहे.

Pune Traffic News
Temple Wall Collapses : हृदयद्रावक! नरसिंह मंदिराची भिंत भाविकांवर कोसळली, ८ जणांचा मृत्यू

असे असतील वाहतुकीत बदल

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जाणे

स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे

दारुवाला पुलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Pune Traffic News
Kolkata Hotel Fire : रात्रीत आक्रीत घडलं, हॉटेलला भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या बदलांचे पालन करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता, वाहनचालकांनी शक्यतो मध्यवर्ती भाग टाळावा, असेही सुचवण्यात आले आहे.

दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य फुलांची आरास

अक्षय तृतीय निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य फुलांची आरास तयार करण्यात आली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे.बाप्पाला तब्बल अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. मंदिराच्या बाहेरील परिसराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Pune Traffic News
HSC SSC Result Date : दहावी बारावी निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com