Temple Wall Collapses : हृदयद्रावक! नरसिंह मंदिराची भिंत भाविकांवर कोसळली, ८ जणांचा मृत्यू

8 Dead as Temple Wall Collapses During Festival in Vizag : विशाखापट्टणम येथील नरसिंह मंदिरात चंदनोत्सव दरम्यान भिंत कोसळून ८ भाविकांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी आहेत. बचावकार्य सुरू असून प्रशासनाने तपासाची घोषणा केली आहे.
8 Dead as Temple Wall Collapses During Festival in Vizag :
8 Dead as Temple Wall Collapses During Festival in Vizag : Google
Published On

Visakhapatnam's Varahalakshmi Narasimha Temple Chandanotsavam festival : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मोठी दुर्घटना घडली. श्री वराहालक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सव सोहळ्यादरम्यान मंदिराची भिंत भाविकांवर कोसळली. या दुर्घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नरसिंह स्वामी मंदिराच्या भिंतीचा २० फूट लांबीचा भाग भाविकांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना मंदिरात चंदनोत्सवाच्या कार्यक्रमावेळी घडली. चंदनत्सवाच्या कार्यक्रमासाठी मंदिरात दरवर्षी लाखो भाविक जमतात. मंगळवारी अचानक मंदिराच्या भिंतीचा एक भाग कोसळला आणि त्याखाली अनेक भाविक अडकले. त्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भिंत कोसळताच परिसरात गोंधळ उडाला आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर धावले.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटेनीतल मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले . येथील बचावकार्य अद्याप सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध एनडीआरएफ पथकाकडून घेतला जात आहे.

8 Dead as Temple Wall Collapses During Festival in Vizag :
Kolkata Hotel Fire : रात्रीत आक्रीत घडलं, हॉटेलला भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

श्री वराहालक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे चंदनोत्सवाला गालबोट लागले आहेत. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने पुढील सूचना येईपर्यंत मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. मंदिर प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

8 Dead as Temple Wall Collapses During Festival in Vizag :
Kolkata Hotel Fire : रात्रीत आक्रीत घडलं, हॉटेलला भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com