Kolkata Hotel Fire : रात्रीत आक्रीत घडलं, हॉटेलला भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Kolkata hotel fire, Ruturaj Hotel tragedy : कोलकाताच्या बडाबाजारमधील ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज असून बचावकार्य सुरू आहे.
14 dead in Kolkata fire, hotel fire
14 dead in Kolkata fire, hotel fire Google
Published On

14 dead in Kolkata hotel fire : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आगीमध्ये होरपून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेन्ट्रल कोलकातामधील बडा बाजार परिसरात असलेल्या हॉटेल ऋतुराजला मंगळवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ही आग हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर सुरू होऊन पाच मजली इमारतीत वेगाने पसरली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घघटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.

मंगळवारी रात्री लागलेली आग रात्री अडीच वाजता भडकली. त्यामध्ये होरपळून १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आलेले आहे. आगीवर निंयत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू आहे. पोलीस, अग्निशामनदल आणि बचावपथकाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. याबाबत अग्निशमनदल आणि पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

१४ जणांचा होरपळून मृत्यू

कोलकातामधील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती स्थिर आहे, तर काहीजण गंभीर भाजले असल्याचे समजतेय.

14 dead in Kolkata fire, hotel fire
Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात, भरधाव कार ट्रकवर आदळली, ४ जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आग पहिल्या मजल्याला लागली होती,ही आग वेगाने पाच मजली इमारतीपर्यंत गेली. त्यामुळे हॉटेलमध्ये अनेक प्रवासी आणि कर्मचारी अकडले. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात आल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे.

हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच कोलकातामधील अग्निशमन दलाच्या १० गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि बचाव पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अद्याप कुलिंगचे काम सुरू आहे.

14 dead in Kolkata fire, hotel fire
HSC SSC Result Date : दहावी बारावी निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून मोठी अपडेट

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथक बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले. इमारतीत अडकलेल्या लोकांना बचाव पथकाने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कोलकाता पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हॉटेलमधील व्यवस्थापनाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. नेमकी आग कशामुळे लागली? याचा शोध घेतला जात आहे.

हॉटेलमध्ये आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. काही प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग विझवण्यात आली असली, तरी बचाव कार्य अजूनही सुरू आहे. कारण काही जण अजूनही हॉटेलमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com