Pahalgam Attack : हालचालींना वेग, पंतप्रधान मोदी अन् मोहन भागवत यांच्यामध्ये खलबतं, पाकिस्तानवर मोठा स्ट्राईक होणार?

PM Modi Mohan Bhagwat meeting : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यात दीड तास चर्चा झाली. लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश तर CCPA बैठकीत कारवाईवर निर्णय होणार.
Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meeting
Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meetingSaam TV News
Published On

Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meeting : पहलगाम हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये चर्चा झाली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामध्ये लष्कराला तयार राहण्याचे संकेत दिले. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला वेळ ठरवण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दरम्यान, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. यामध्ये पहलगाम हल्ला आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजतेय.

सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामधील ही भेट पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झाली. यावेळी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरावर चर्चा झाल्याचे समजतेय. गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीत सहभागी होते. RSS ला भारतीय जनता पक्षाचा (BJP) वैचारिक मार्गदर्शक मानले जाते. त्यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meeting
Kolkata Hotel Fire : रात्रीत आक्रीत घडलं, हॉटेलला भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

RSS ने या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. हे कृत्य देशाच्या एकात्मतेवर आणि अखंडतेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. अहिंसा हा भारताचा धर्म असला तरी "अत्याचारी" आणि "दुष्ट" यांना धडा शिकवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मोहन भागवत यांनी याआधी म्हटले होते. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीतून भारत सरकार दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meeting
Temple Wall Collapses : हृदयद्रावक! नरसिंह मंदिराची भिंत भाविकांवर कोसळली, ८ जणांचा मृत्यू

दहशतवाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सीसीपीएची बैठक होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांविरोधात काय कारवाई करण्यात येईल, याबाबत चर्चा होणार आहे. दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या हल्ल्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येतेय. भारताकडून हल्ल्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर पाकिस्तानची तारांबळ उडाली आहे. पाकिस्तानचे मंत्र्‍याने भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असे म्हणत आम्हीही तयार असल्याचे सांगितले.

Pahalgam terror attack, PM Modi Mohan Bhagwat meeting
Pune : अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com