Indian Army : 'याचना नहीं, अब रण होगा'; भारतीय लष्कराची ताकद, १० मुद्दे अन् पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा
Operation Sindoor, Indian Army press conference : शस्त्रीसंधीनंतरही हल्ले करणारा विश्वासघातकी पाकिस्तान सुधारायचं नाव घेत नाही. याच पाकिस्तानला आता भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी कडक शब्दांत इशारा दिलाय. गरज पडली तर पुढची लढाई आणि मिशनसाठी तयार आहोत. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय, असा सज्जड दम भारतानं भरला.
आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दुर्दैवानं पाकिस्ताननं दहशतवाद्यांनाच मदत केली. त्यामुळं आम्ही जोरदार प्रत्युत्तर दिलं. चिनी मिसाइल, तुर्की ड्रोन पाडले. समुद्रात रोखलं. त्यांचं जे काही नुकसान झालंय, त्याला पाकिस्तानच जबाबदार आहे, असं सुनावलं. 'आमचा नाद करायचा नाय' असा संदेश देश भारताकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्या पाकिस्तानसह इतर देशांनाही कडक इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरबाबात आज भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत केलेली कारवाई आणि पाकिस्तानविरोधात उचललेल्या पावलांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराने आपण फक्त दहशतवाद्यांविरोधात असल्याचे पुन्हा एकदा ठासून सांगितले.
पाकिस्तानची मिसाईल पाडली -
पाकिस्तानची पीएल १५ मिसाईल आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने उद्धवस्त केली. पाकिस्तानचे ड्रोन हवेतच पाडले. पाकिस्तानच्या मेड इन चीन मिसाईल हवेतच नष्ट केल्या. पाकिस्तानमधून आलेले सर्व हल्ले सीमेत राहूनच परतवले. आम्ही याची आधीच तयारी केली होती, अशी माहिती लष्करानी दिली.
भारताची लढाई दहशतवाद्याविरोधात -
आपली लढाई दहशतवादी आणि दहशतवाद्याविरोधात आहे. त्यामुळे ७ मे रोजी दहशतवादी तळावर हल्ला केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ द्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्युत्तर देणं गरजेचं होते. यामध्ये त्यांचे जे काही नुकसान झाले, त्याला तेच जबाबदार आहे. आपल्या एअर डिफोन्स सिस्टमल भेदणं, नुकसान पोहचवणं पाकिस्तानसाठी कठीण होतं, असेही लष्कराने सांगितले.
पाकिस्तानने दहशतवाद्याला साथ दिली
७ मे रोजी आम्ही फक्त दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. पण पाकच्या लष्कराने दहशतवाद्यांना साथ दिली. पाकमध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतोय. पाकिस्तानच्या नुकसानीसाठी तेच जबाबदार आहेत.
आकाश मिसाईलचा वापर केला
आपल्या डिफोन्स सिस्टमली भेदणं अशक्य आहे. पाकिस्तानविरोधातील लढाईत आम्ही आकाश मिसाईलच वापर केला, असेही लष्कराने सांगितले. एअर डिफेन्स सिस्टम ही देशासाठी भिंतीसारखी उभी राहिली.
पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानला इशारा देताना एअर मार्शल भारती यांनी रामायणातील एक कडवे वाचून दाखवले. 'विनय न माने जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति'... असे म्हणते समजूतदारासाठी इशारा पुरेसा आहे, असे ते म्हणाले.
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला -
पाकिस्तानचा पापाचा घडा भरला आहे. पाकने ९ आणि १० मे रोजी केलेला हल्ला परतवला. पाकिस्तानची यंत्रणा भारतासमोर कुचकामी आहे. दहशतवाद्यांविरोधात भारताची कारवाई सुरूच राहणार आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत केली. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्यामुळे पाकिस्तानवरही प्रतिहल्ला करावा लागला.
पाकिस्तानला सागरी हद्दतून हुसकावून लावले -
पाकिस्तानचे एअरबेस उद्धवस्थ केले. मिसाईल आणि ड्रोन पाडले, असे लष्कराने सांगितले. ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रत्येक जवानाने साथ दिली, असेही सांगण्यात आले. भारताच्या सागरी हद्दीत पाकिस्तानला घुसून दिले नाही. नौदल पूर्णपणे सज्ज होतं.
जगाला ताकद दाखवली
पाकिस्तानने तुर्की बनावटीच्या ड्रोनने हल्ला केला. तुर्की असो की दुसऱ्या कोणत्या देशाचा ड्रोन कुणालाही प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. आमच्यासमोर कुणीही आले तर उत्तर देण्यास तयार असल्याचे आम्ही दाखवून दिलेय. आम्हाल जास्त काही सांगायची गरज नाही, आम्ही जगाला सर्व काही दाखवलेय, असे एअर मार्शल एसके भारती म्हणाले.
गरज पडल्यास आम्ही पूर्णपणे तयार
आपल्याकडील सर्व लढाऊ विमान आणि हत्यारे व्यवस्थित आहेत, गरज पडल्यास चालवता येतील. कोणत्याही पुढील मिशन, युद्धासाठी आम्ही तयार आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये बीएसएफने पूर्णपणे साथ दिली, असे एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले.
चीनी मिसाइल पाडली
पाकिस्तानची मेड इन चीन मिसइल आम्ही हवेतच पाडली. पाकिस्तानने भारतावर चीनच्या मिसाइलने हल्ला केला होता. भारताने हवेतच मिसाइल पाडले. पाकिस्तानने सोडलेले तुर्की मेड ड्रोनही हाणून पाडले. युद्धात आम्ही ताकद दाखवली, असे लष्कराने सांगितले.
पहलगामपर्यंत त्यांचा पापाचा घडा भरला
ऑपरेशन सिंदूरच्या हवाई संरक्षण कारवाईला आपण एका संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात दहशतवादी कारवायाच्या स्वरूपात बदल होत होता, आता आमच्या सैन्याबरोबरच निष्पाप लोकांवरही हल्ले होऊ लागले. 2024 मध्ये मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेकरूंवर आणि यंदा एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला झाला. पहलगामपर्यंत त्यांचा पापाचा घडा भरला होता... कारण आमच्या अचूक हल्ल्यांनी दहशतवाद्यांना एलओसी आणि आयबी ओलांडूनही लक्ष्य केले होते, आम्हाला पूर्ण खात्री होती की पाकिस्तानचा हल्ला सीमेपलीकडूनच होईल, म्हणून आम्ही हवाई संरक्षणाची तयारी केली होती. जेव्हा 9-10 मे रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने आमच्या हवाई तळ आणि लॉजिस्टिक सुविधांवर हल्ला केला, तेव्हा ते आमच्या मजबूत हवाई संरक्षण जाळ्यापुढे अपयशी ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.