मुख्यमंत्र्यांनी सोडले शासकीय निवासस्थान! 14 एप्रिलला राजीनामा देणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nitish Kumar Vacates Official Residence Ahead Of Resignation: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शासकीय निवासस्थान सोडताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 14 एप्रिलला राजीनामा आणि 15 एप्रिलला नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Nitish Kumar shifts out of official residence ahead of anticipated resignation, triggering political speculation in Bihar.
Nitish Kumar shifts out of official residence ahead of anticipated resignation, triggering political speculation in Bihar.saam tv
Published On

नितीश कुमार यांनी राज्यसभा सदस्येची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपले निवासस्थान सोडले आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉलीने त्यांचे सामान हलवण्यास सुरुवात झाले असून 14 एप्रिलला ते राजीनामा देणार आहेत. तर 15 एप्रिलला बिहारमध्य नवीन सरकार स्थापना होणार आहे. 10 एप्रिल रोजी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Nitish Kumar shifts out of official residence ahead of anticipated resignation, triggering political speculation in Bihar.
ED Raid : माजी शिक्षणमंत्र्यांच्या घरावर ईडीची छापेमारी; निवडणुकीआधीच मोठी कारवाई, पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ

मुख्यमंत्र्यांनी निवासस्थान सोडताच राजकीय घडामोडींना वेग

14 एप्रिल रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने त्याच्या निवासस्थानाबाहेर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच 15 तारखेला राज्यात नवीन सरकार देखील स्थापन होणार आहे.

Nitish Kumar shifts out of official residence ahead of anticipated resignation, triggering political speculation in Bihar.
Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

नितीश कुमार निवासस्थान का सोडत आहे याची अधिकृत माहिती समोर आली जरी नसली तरी बिहारमध्ये राजकीय वारे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 7 सर्कुलर रोड येथील निवासस्थानी राहणार आहेत. ते आधी देखील त्याच निवासस्थानी राहत असे.

नितीश कुमार यांच्या नवीन निवासस्थानाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या स्थलांतरानंतर त्यांचे नवीन निवासस्थान लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाला लागून असेल, ज्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी राहतील. ही बाब राजकीयदृष्ट्या रंजक मानली जात आहे. कारण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे दोघेही दीर्घकाळापासून बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com