

बिहारच्या राजकारणात मोठा बदल होत आहे. बऱ्याच वर्षांपासून मुख्यमंत्रिपदी राहिलेले नितीश कुमार आता दिल्लीत जाणार आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून नव्या भूमिकेत ते दिसणार आहेत. खासदारकीच्या शपथविधीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. तेथे प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती दिली.
नितीश कुमार हे उद्या, शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार उद्या दुपारी १२.१५ वाजता खासदारकीची शपथ घेतील. शपथविधीनंतर उद्या संध्याकाळी ते दिल्लीहून बिहारला परतणार आहेत. मी उद्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. बिहार सोडून दिल्लीत आलो आहे. तीन चार दिवसांत बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होईल. याआधी मी दिल्लीतच होतो. खूप वर्षे इथे काम केले आहे. त्यानंतर मध्यंतरी बिहारला गेलो होतो. आता पुन्हा आलो आहे, असे नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
नितीश कुमार यांनी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. सत्ता परिवर्तनाच्या हालचालीही वेगाने सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतील सर्व पक्ष हे येत्या १४ किंवा १५ एप्रिलला राज्याचे नवे मुख्यमंत्री निवडतील, अशी शक्यता आहे.
नितीश कुमार यांना राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन हे सदस्यत्वाची शपथ देतील. १६ मार्च रोजी त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. त्यानंतर ३० मार्च रोजी नितीश कुमार यांनी बिहारच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सत्तापरिवर्तनाच्या या घडामोडी सुरू असतानाच, त्यांचे निकटवर्तीय मंत्री विजय कुमार चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. नितीश कुमार हे लवकरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. बिहारमध्ये एनडीएची सत्ता राहील. नितीश मॉडेलनुसार राज्याचा कारभार चालेल, असे चौधरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.