देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. सलग 3 वेळा जनतेचा कौल मिळवत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पंतप्रधानपदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकला आहेत.मात्र या विक्रमावरुनही आज सकळपासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झाले.
नेहरुंच्या कार्यकाळाची बरोबरी होईल मात्र नेहरुंची बरोबरी होणार नाही अशा शब्दात काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर दिले. तर मोदींचे भविष्यातील रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही असा दावा भाजपनं केला. पंतप्रधान मोदींच्या कारकीर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिम्मित भाजपकडून मेगा प्लॅनिंग सुरु आहे. उद्यापासून प्रगती पथ यात्रा सुरु होणार असून यामध्ये सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि नेते सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे दिल्लीमध्ये गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून तपपूर्ती कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत देशाचे अभिनंदन केले आणि कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.