heat wave : उष्णतेचा प्रकोप! लोकसभा निवडणूक ड्युटीवरील ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर

heat wave in uttar pradesh : उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका सरकारी कर्मचारी आणि होमगार्डला बसला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात होऊन ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे होमगार्डच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 लोकसभा निवडणूक ड्युटीसाठी आलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर, परिसरात खळबळ
Vidarbha Heat Wave Saam TV
Published On

मिर्झापूर : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या ड्युटीदरम्यान ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिर्झापूरमध्ये उष्माघातामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ६ होमगार्ड आणि ३ इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २० होमगार्ड कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील काही लोकसभा मतदारसंघात शनिवारी मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. या मतदानासाठी विविध विभागातील होमगार्डना मतदारसंघात तैनात करण्यात आलं आहे.

 लोकसभा निवडणूक ड्युटीसाठी आलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर, परिसरात खळबळ
Heatwave Effect On Eyes: वाढत्या उष्णतेचा आरोग्यासोबतच डोळ्यांना होतोय त्रास; होतायत गंभीर आजार;धोका टाळण्यासाठी करा हे उपाय

निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशातील मिर्झापुरात उष्णतेची लाट सुरु आहे. त्यात निवडणुकीच्या ड्युटीसाठी आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. यापैकी ६ होमगार्डचा मृत्यू झाला आहे. यात ६ होमगार्ड आणि ३ इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २० हून अधिक संशियत उष्माघात झालेल्या होमगार्डना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उपचारादरम्यान ६ होमगार्डचा मृत्यू

निवडणुकीच्या ड्युटीसाठी आलेल्या ६ होमगार्डना ट्रॉमा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा उपचारादरम्यान ६ होमगार्डचा मृत्यू झाला आहे. रामजियावन, सत्य प्रकाश, रामकरन, बच्चाराम, त्रिभुवन या मृत होमगार्डची नावे समोर आली आहेत. सध्या या ट्रॉमा सेंटरमध्ये २० होमगार्डवर उपचार सुरु आहेत. या होमगार्डना उष्माघातामुळे चक्कर येऊ लागल्या. डोळ्यासमोर अंधारी आली. त्यानंतर अनेक होमगार्ड बेशुद्ध झाले.

 लोकसभा निवडणूक ड्युटीसाठी आलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर, परिसरात खळबळ
Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

मिर्झापूरमधील जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन यांनी होमगार्डचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या होमगार्डनी त्यांना झालेल्या त्रासाविषयी माहिती दिली. उष्णतेच्या लाटेमुळे बेशुद्ध झाल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com