Heatwave Effect On Eyes: वाढत्या उष्णतेचा आरोग्यासोबतच डोळ्यांना होतोय त्रास; होतायत गंभीर आजार;धोका टाळण्यासाठी करा हे उपाय

Heatwave Effect On Eyes : वाढत्या उष्णतेचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे. नागरिकांना अनेक आजार होत आहे. याच वाढत्या उन्हाचा आपल्या डोळ्यांवरदेखील परिणाम होत आहे. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
Heatwave Effect On Eyes
Heatwave Effect On EyesSaam Tv

मे महिना संपत आला असला तरीही उष्णता कमी होत नाही. उष्णतेमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना अनेक आजार होत आहे. या काळात चक्कर येणे,उलट्या होणे असे आजार होतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यात शरीरासोबतच डोळ्यांना खूप त्रास होतो.

सध्या उन्हाळा खूप तीव्र आहे. त्यामुळे जेव्हा ऊन डोळ्यांवर येते तेव्हा खूप त्रास होतो.त्याचसोबत दृष्टीवरदेखील परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

उष्णतेच्या लाटेमुळे डोळ्यांना धोका

डोळे कोरडे होणे- सध्या तापमान खूप जास्त आहे. त्यामुळे डोळ्यातील पाणी सुकते, डोळे लाल होतात. डोळ्यांची जळजळ होते.

अॅलर्जी- उष्णतेमुळे प्रदुषण खूप वाढत आहे. वाढणाऱ्या प्रदुषणामुळे धुळीचे कण डोळ्यात जातात. त्यामुळे डोळ्यांची आग होते. डोळ्यांसोबतच डोळ्यांच्या खालच्या बाजूच्या त्वचेची जळजळ होते. त्वचा लाल होते.

Heatwave Effect On Eyes
Solo Travelling: महिलांमध्ये वाढतोय सोलो ट्रिपचा ट्रेंड; जवळपास ३५ टक्के महिला एकट्या फिरतायत जग

उष्णतेच्या लाटेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे कराल

घराबाहेर पडताना नेहमी UV ब्लॉक सनग्लासेस घालावे. यामुळे उन्हाच्या तीव्र किरणांचा डोळ्यांना त्रास होणार आहे. घराबाहेर पडताना नेहमी पाणी घेऊन बाहेर पडा. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी प्यायचे असते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यात डोळ्यातील पाणी सुकून ते कोरडे होतात. त्यामुळे नेहमी आय ड्रॉप सोबत ठेवावे. उन्हाळ्यात जास्त स्क्रिन टाइम डोळ्यांसाठी घातक ठरु शकतो. या काळात जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही समोर बसू नये. घराबाहेर पडताना नेहमी छत्रीचा वापर करावा. छत्रीमुळे उन्हापासून आपला बचाव होतो. त्यामुळे डोळ्यांसोबतच त्वचेलादेखील त्रास होणार आहे.

Heatwave Effect On Eyes
World Tobacco Day : कितीही प्रयत्न केले तरी तंबाखूचं व्यसन सुटत नाहीये; मग आजपासूनच ही थेरेपी सुरू करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com