Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

14 People Died Due To Heat Stroke In Bihar: बिहारमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्णाघाताचा त्रास होऊ लागला आहे. उष्माघातामुळे बिहारमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झालाय.
Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू
Bihar Heat Wavesaam tv
Published On

बिहारमध्ये (Bihar) सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. बिहारमध्ये वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह प्राण्यांना देखील बसत आहे. बिहारमधील अनेक ठिकाणचे तापमान हे ४७ अंश सेल्सिअस पार गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. उन्हामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता बिहारमधील शाळा, कॉलेज, अंगणवाडींना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. अशामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये बिहारमध्ये १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामध्ये १० निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बिहारच्या आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये २४ तासांमध्ये १० निवडणूक कर्मचाऱ्यांसह १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक जण हे भोजपूरमधील आहेत. याठिकाणी ५ निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त रोहतासमध्ये ३ निवडणूक अधिकाऱ्यांचा आणि कैमूर तसंच औरंगाबादमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू
Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?

मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिहारमध्ये सध्या सगळीकडे तीव्र उष्णता जाणवत आहे. अनेक भागात सर्वाधिक तापमान ४४ अंशापेक्षा जास्त आहे. गुरूवारी बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बिहारमधील उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारने सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू
Bihar Temprature: बिहारमध्ये उष्णतेचा कहर! 24 तासांत उष्माघाताने 16 जणांचा मृत्यू, तापमान 48 अंशापार

दरम्यान, बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ४० जागांसाठी सात टप्प्यामध्ये मतदान होत आहे. शनिवारी ८ जागांसाठी मतदान होणार आहे. अशामध्ये नागरिकांनी मतदान करण्यासाठी जाताना काळजी घ्यावी. तसंच सकाळीच मतदान करण्यासाठी जावे असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान होते. २४ तास हवामान कोरडे होते.

Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू
Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com