Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले

Muzaffarpur News: या घटनेमुळे बिहार हादरले आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी (Bihar Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले
Bihar Crime NewsSaam tv

बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे. पीडित तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडसोबत त्याच्या मित्रांनी असे एकूण ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे बिहार हादरले आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी (Bihar Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या अहियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीला चुकीच्या नंबरवरून मिस कॉल आला होता. हा नंबर राजू कुमार नावाच्या तरुणाचा होता. राजू हा अहियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. एका चुकीच्या नंबरवरून आलेल्या मिस्ड कॉलनंतर दोघांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांमध्ये बोलणं सुरू झाले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांना भेटू लागले.

Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले
Iran Helicopter Crash: इराणच्या राष्ट्रपतींचा शेवटचा VIDEO आला समोर, हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी नेमकं काय झालं?

राजू आपल्या गर्लफ्रेंडला अनेकदा बाईकवरून फिरायला घेऊन जायचा. त्यांच्या भेटीगाठी खूपच वाढल्या होत्या. अशामध्ये राजूने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला बोलावले. नेहमीप्रमाणे ती त्याला भेटायला गेली. बाईकवरून तो तिला घेऊन गेला. अहियापूर परिसरात ते फिरायला गेले होते. यावेळी राजू तिला निर्जन ठिकाणी एका शेतामध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केली. राजू दारूच्या नशेमध्ये होता.

Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले
Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

राजू ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या तीन मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. त्याने गर्लफ्रेंडसोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. तरुणीने त्याला नकार दिला. तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राजूचे तिन्ही मित्र घटनास्थळी आले. या सर्व जणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणी त्यांना सोडून देण्यासाठी विनवनी करत होती पण त्यांनी तिचे एकही ऐकले नाही. यानंतर आरोपी तरुणीला तिथेच सोडून पळून गेले.

Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले
Narendra Modi: गांधी घराण्याच्या ४ पिढ्यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला; पंतप्रधान मोदींची जहरी टीका

या घटनेनंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत बलात्कार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी मुख्य आरोपी राजूला अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Bihar Crime News: गर्लफ्रेंडला एकांतात भेटायला बोलावलं अन् मित्रांच्या हवाली केलं; बॉयफ्रेंडच्या भयानक कृत्याने पोलिसही हादरले
Rahul Gandhi: द्वेषाच्या राजकारणाला देश कंटाळलाय..., भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com