Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर अझरबैजानमध्ये क्रॅश झाल्याची बातमीस समोर येत आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू
Ebrahim Raisi helicopter crashSaam Tv

Ebrahim Raisi Helicopter Crash News:

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर अझरबैजानमध्ये क्रॅश झाल्याची बातमीस समोर येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जमखी झाले आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर आहे, त्यापैकी एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याशी संपर्क तुटला आहे. ड्रोनचा वापर करून ताफ्याचा शोध घेतला जात आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू
Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

रायसी हे इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात हेलिकॉप्टरने प्रवास करत होते, असं सांगितलं जात आहे. इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर अझरबैजानच्या सीमेवर असलेल्या जोल्फाजवळ हा अपघात झाला.

इराणच्या सरकारी टीव्हीनुसार, बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र खराब हवामानामुळे त्यांना अडथळे येत आहे. येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू
PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

इराणच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रायसी रविवारी सकाळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी तिथे गेले होते. दोन्ही देशांमधील आरस नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. तेथून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com