इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस (Iran President Ebraim Raisi) आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. रविवारी ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हेलिकॉप्टर क्रॅश (Iran Helicopter Crash) होण्यापूर्वीचा इराणच्या राष्ट्रपतींचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी इराणच्या राष्ट्रपतींनी धरणाचे उद्घाटन केले होते.
इराणची राज्य वृत्तसंस्था 'IRNA' च्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष रायसी हे इराणच्या अझरबैजान रिपब्लिकच्या सीमेवरील धरणाच्या उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटन समारंभ संपल्यानंतर परत जात असताना रविवारी वराजकान भागात त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातापूर्वी राष्ट्रपती रायसी यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे दिसत आहेत.
असोसिएटेड प्रेसने जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये रायसी आपल्या सहकाऱ्यांसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसलेले दिसत आहेत. रायसी हे अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी हस्तांदोलन करताना आणि बोलतानाही दिसतात. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बसून ते इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.
रविवारी वायव्य इराणमध्ये क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी, एक इमाम, फ्लाइट आणि सुरक्षा क्रू सदस्यांसह नऊ जण होते. यामध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी, परराष्ट्र मंत्री होसैन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मालेक रहमती, इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, तसेच एक पायलट, को-पायलट, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षकाचा समावेश होता.
बचाव कर्मचारी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्याठिकाणी पोहोचले आहेत. मात्र, हेलिकॉप्टरमधील लोकांची स्थिती काय आहे हे एजन्सीने सांगितले नाही. या हेलिकॉप्टर क्रॅशनंतरचा ड्रोन व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.