Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?
Delhi Water Crisis:Saam TV

Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?

Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावरुनच आता केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तीन राज्यांकडून अतिरिक्त पाणी देण्याची मोठी मागणी करण्यात आली आहे.
Published on

दिल्ली, ता. ३१ मे २०२४

एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यमुना नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने दिल्लीवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असून अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अशातच आता दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर केजरीवाल सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजधानी दिल्लीवर ओढावलेल्या पाणी संकटानंतर आता दिल्ली सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजधानीत पाण्याची समस्या भेडसावत असून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून एक महिनाभर अतिरिक्त पाणी देण्यात यावे, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

"कडाक्याच्या उन्हात दिल्लीची पाण्याची गरज वाढली आहे, देशाच्या राजधानीच्या गरजा पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच वाढती पाणीटंचाई लक्षात घेता दिल्ली सरकारने नागरिकांवर निर्बंधही घातले आहेत.

Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?
Hassan Mushrif: 'मनुस्मृतीवरुन वादंग! छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण अन् राष्ट्रवादीत ठिणग्या; हसन मुश्रीफ संतापले!

केजरीवाल यांचे विरोधकांना आवाहन!

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेत्यांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय राजधानीतील जलसंकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कडक उन्हामुळे पाण्याची मागणी खूप वाढली आहे. आणि शेजारच्या राज्यांमधून दिल्लीला जे पाणी मिळायचे तेही कमी झाले आहे. म्हणजे मागणी खूप वाढली आणि पुरवठा कमी झाला. हा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?
Maharashtra Politics 2024 : नाशिकची जागा जिव्हारी लागली, छगन भुजबळ स्वगृही परतणार का? विद्या चव्हाण म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com