Hassan Mushrif: 'मनुस्मृतीवरुन वादंग! छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण अन् राष्ट्रवादीत ठिणग्या; हसन मुश्रीफ संतापले!

Hassan Mushrif Vs Chhagan Bhujbal: मनुस्मृतीच्या वादावरुन छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. यावरुन नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे.
Hassan Mushrif: 'मनुस्मृतीवरुन वादंग! छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण अन् राष्ट्रवादीत ठिणग्या; हसन मुश्रीफ संतापले
Hassan Mushrif Vs Chhagan Bhujbal: Saamtv

रणजित माजगावकर, कोल्हापूर, ता. ३१ मे २०२४

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एकीकडे आव्हाडांच्या या कृतीवरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असतानाच राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली. यावरुनच आता राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

"जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेले पोस्टर फाडले ही गोष्ट निंदनीय तर आहेच. मात्र आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी या संदर्भात खडे बोल सुनावले पाहिजे होते, ही कृती अत्यंत चुकीची आहे याबाबत बोललं पाहिजे होतं," असे हसन मुश्रीफ म्हणाले.

तसेच "छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात मला काहीही माहिती नाही, यासंदर्भात आमचे नेते अजित दादा पवार सांगू शकतील. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव परदेशी दौऱ्यावर आहेत ते लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेत रुजू होतील," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Hassan Mushrif: 'मनुस्मृतीवरुन वादंग! छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण अन् राष्ट्रवादीत ठिणग्या; हसन मुश्रीफ संतापले
Nashik News : कबूतर शर्यतीवरून वाद, नाशिकमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या; तीन संशयित ताब्यात

महायुती १०० टक्के टिकेल!

"लोकसभेला ज्या पद्धतीने आपणाला कमी जागा देण्यात आल्या त्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत तसं होऊ नये यासाठी आत्ताच आपल्या नेतेमंडळींना या जागांसाठी प्रयत्न करा असं सूचित केलेले आहे. महायुती 100% टिकेल. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर आपल्याला स्पष्ट समजेल," असा विश्वासही यावेळी हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Hassan Mushrif: 'मनुस्मृतीवरुन वादंग! छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण अन् राष्ट्रवादीत ठिणग्या; हसन मुश्रीफ संतापले
Nagpur Breaking News: डबा पार्टी जिवावर बेतली! मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com