Maharashtra Politics 2024 : नाशिकची जागा जिव्हारी लागली, छगन भुजबळ स्वगृही परतणार का? विद्या चव्हाण म्हणाल्या...

Vidya Chavan Vs Chhagan Bhujbal : नाशिकचं तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा आहे. त्यावर आज विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

नाशिक लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकची जागा भुजबळांना लढवायची होती, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांच्या जिव्हारी लागलं असेल. त्यावरून ते नाराज असतील असं वाटतं. मात्र ते स्वगृही परतानार का? हे तेच स्पष्ट सांगू शकतील असं विद्या चव्हान यांनी म्हटलं आहे.

कोस्टल रोडला काही ठिकाणी गळती लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वाहणी करून मुख्य मार्गाला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर कोस्टड रोड वाहून जाऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी ती संकल्पना होती. मात्र यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी घाईघाईने उद्धाटन केलं. मोठे टेक्निशीयन बोलवून याची पाहणी व्हायला हवी. जोपर्यंत खात्री पटत नाही. तोपर्यंत हा मार्ग सुरू करता कामा नये आणि जर काही दुर्घटना घडली तर त्याला सरकार जबाबदार असेल, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics 2024
Nana Patole News: 'सध्या मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवा', CM शिंदेंच्या व्हिडिओवरुन नाना पटोलेंचे टीकास्त्र!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com