NMC चा मोठा निर्णय, MBBS साठी आता १० वर्षांची मुदत; नापास होणाऱ्यांना फक्त ४ संधी

MBBS course duration : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना १० वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी केवळ ४ संधी मिळणार आहेत.
MBBS New Rule
MBBS New Rule
Published On

MBBS New Rule | Medical Students Rules : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमबीबीएसची (MBBS) पदवी पूर्ण करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कमाल १० वर्षांची कालमर्यादा (Time Limit) असणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (National Medical Commission - NMC) जुनी ९ वर्षांची मुदत वाढवून ती आता १० वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

MBBSसाठी आता 10 वर्षे

NMC नं जुनी नऊ वर्षांची मुदत वाढवून 10 वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नव्या नियमावलीनुसार, साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम आणि एक वर्षाची इंटर्नशिपसह विद्यार्थ्यांना 10 वर्षांतच शिक्षण पूर्ण करावं लागेल, अन्यथा त्यांची पदवी रद्द होईल. विशेष म्हणजे, प्रथम वर्षात नापास होणाऱ्यांना केवळ चारच संधी मिळतील. या मसुद्यावर NMCनं ई-मेलद्वारे हरकती मागवल्या असून यामुळे वसतिगृहातील खोल्या वर्षानुवर्षे अडवून ठेवणाऱ्या मुजोर विद्यार्थ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

काय आहे नवीन नियमावली?

एनएमसीच्या (NMC) नव्या नियमांनुसार, साडेचार वर्षांचा मुख्य अभ्यासक्रम आणि एक वर्षाची इंटर्नशिप यासह विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत कमाल १० वर्षांच्या आत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी या १० वर्षांच्या कालमर्यादेत शिक्षण पूर्ण करू शकला नाही, तर त्याची एमबीबीएसची पदवी थेट रद्द केली जाईल.

MBBS New Rule
Pune : पुण्यातील १४ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, दारूमध्ये..

प्रथम वर्षासाठी केवळ ४ संधी

या नव्या मसुद्यात वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आणखी एक कडक नियम करण्यात आला आहे. त्यानुसार, एमबीबीएसच्या प्रथम वर्षामध्ये (First Year) नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ ४ संधी (Attempts) दिल्या जातील. ४ संधींमध्येही प्रथम वर्ष उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घेता येणार नाही.

या विद्यार्थ्यांना बसणार चाप

अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थी वर्षानुवर्षे नापास होऊन किंवा संथ गतीने अभ्यासक्रम पूर्ण करत वसतीगृहातील (Hostels) खोल्या अडवून ठेवतात. एनएमसीच्या या कडक निर्णयामुळे हॉस्टेलच्या खोल्या अडवून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच चाप बसणार असून, नव्या आणि गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

MBBS New Rule
पुणे हादरले! दारू प्यायल्यानंतर अचानक पोटदुखी आणि मळमळ, एकाच कुटुंबातील ४ जणांसह ५ जणांचा बळी; जबाबदार कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com