Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

Building Fire at Noida: नोएडा फेज-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुरा गावात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक अजूनही आत अडकले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्याद्वारे सुमारे ५० जणांची सुटका केली आहे.
Scooter Charging Blast Triggers Deadly Noida Building Fire, 2 Killed
Scooter Charging Blast Triggers Deadly Noida Building Fire, 2 KilledSaam TV
Published On
Summary
  • नोएडा आग दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू

  • अग्निशमन दलाने 50 जणांची सुटका केली

  • मामुरा गावातील आग प्रकरणाची ताजी माहिती

नोएडा फेज-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुरा गावातील एका ५ मजली इमारतीला भीषण आग लागली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक अजूनही आत अडकले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्याद्वारे सुमारे ५० जणांची सुटका केली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलिसांनी या पाच मजली इमारतीच्या मालकाला ताब्यात घेतलंय.

Scooter Charging Blast Triggers Deadly Noida Building Fire, 2 Killed
MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

पाच मजली इमारतीला आग कशी लागली?

इलेक्ट्रिक बाईकमधून उडालेल्या ठिणगीमुळे इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली असावी, हे कारण सांगितलं जातंय. इमारतीच्या आत पार्क केलेल्या एका इलेक्ट्रिक बाईकमधून अचानक ठिणग्या उडू लागल्या आणि त्यानंतर आगीने संपूर्ण परिसराला वेगाने आपल्या विळख्यात घेतले. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे खरे कारण अजूनही समोर आले नाहीये. या घटनेप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Scooter Charging Blast Triggers Deadly Noida Building Fire, 2 Killed
Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं

आग इतक्या वेगाने पसरली की काही क्षणात अख्खी इमारत आगीच्या विळकख्यात अडकली. अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरित बचावकार्य सुरू केले आणि सुमारे ५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी शिड्या आणि इतर उपकरणांचा वापर केला गेला. काहींना तर एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी शिड्या लावून बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com