Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

Shoe factory fire death : चीनच्या फुजियान प्रांतातील जिनजियांग येथे शू फॅक्ट्रीला भीषण आग लागून २८ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे.
Shoe factory fire death
Shoe factory fire death Saam TV Marathi
Published On

शू फॅक्ट्रीत लागलेल्या भीषण आगीमध्ये २८ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चीनमधील फुजियान प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शेकडो कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, जिनजियांग शहरातील चेंडाई टाउनशिपमधील जिआंगटौ गावातील कैतुओ रोड ईस्टवरील हुईटेंग शूज फॅक्टरीमध्ये आग लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:०४ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडल्याची नोंद आहे. काही मिनिटांतच आग वाऱ्यासारखी पसरली अन् ज्वाळांनी संपूर्ण इमारत व्यापली. आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले होते.

Shoe factory fire death
IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

चप्पल कारखान्यात लागलेली ही आग विझवण्यासाठी क्वानझोऊ प्रशासनाने १८३ अग्निशमन जवान आणि ३५ अग्निशमन गाड्या पाठवल्या. बचाव पथकांनी अनेक तास प्रयत्न केल्यानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. चिनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये कारखान्यातील भीषण दृश्ये दिसत होती. आगीच्या उंच ज्वाळांनी इमारतीचा मोठा भाग व्यापला होता आणि दाट धुराचे लोट आकाशात पसरले होते. अनेक लोक छतावर अडकलेले दिसत होते आणि बचाव पथके त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना ते मदतीसाठी हातवारे करत होते. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.

Shoe factory fire death
Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

बचावकार्याचे आदेश

अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या आगीची तात्काळ दखल घेत बचावकार्याचे आदेश दिले. दुर्घटनाग्रस्त कारखान्यात अडकलेल्या कोणालाही वाचवण्यासाठी आणि जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आणि आगीच्या कारणाचा जलदगतीने तपास करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

Shoe factory fire death
मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com