Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

Hubballi husband arrested for wife's murder : कर्नाटकातील हुबळी येथे लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत १९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे.
Hubballi husband arrested for wife's murder
Hubballi husband arrested for wife's murderSaam TV Marathi
Published On

Karnataka newly married woman murder case : १९ वर्षांच्या पत्नीला पतीने हेल्मेटने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील हुबळीजवळ घडली. लग्नानंतर फक्त ४ महिन्यातच पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. दोघांमध्ये नेमकं काय झालं? सुखी संसाराची सुरूवात झाली असतानाच पतीने पत्नीची निर्घृण हत्या का केली? अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

मृत महिलेचे नाव नागारत्ना हेलेमनी असे आहे. तर आरोपी पतीचे नाव शिवराज असे आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये नागारत्ना आणि शिवराज यांचं थाटमाटात लग्न झालं होते. शिवराज हा हुबळीजवळील तरीहाल गावातील आहे, तर नागारत्ना ही इब्राहिमपूरमधील आहे. ४ महिन्यांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहून शिवराजच्या घरी आलेल्या नागारत्नाची हत्या झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Hubballi husband arrested for wife's murder
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

नागारत्नाच्या कुटुंबियांनी शिवराजच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी नागारत्नाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. लग्नाच्या ४ महिन्यातच शिवराजने नागारत्नाला का मारले? याची चौकशी करण्यात येत आहे.

Hubballi husband arrested for wife's murder
Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शिवराज आणि नागारत्ना यांच्यामध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद सुरू झाला होता. हा वाद वाढत गेला अन् संतापलेल्या शिवराजने जवळच असलेल्या हेल्मेटने नागारत्ना हिच्यावर हल्ला केला. शिवराजने हेल्मेटने नागारत्नाच्या पाठीत, डोक्यात सपासप मारले. या हल्ल्यात नागारत्ना गंभीर जखमी झाल्या अन् जमिनीवर कोसळली अन् जागेवरच मृत्यू झाला.

Hubballi husband arrested for wife's murder
IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

पोलिसांनी नेमकं काय सांगितले ?

४ महिन्यांपूर्वी दोघेंचे लग्न झालं होतं. बुधवारी दोघांमध्ये अचानक वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर हेल्मेटने मारहाण केली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, असे पोलीस अधीक्षक गुंजन आर्या यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी शिवराजला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Hubballi husband arrested for wife's murder
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com