

खंडाळा घाटात पुसद-अकोला एसटी बसला आग लागलीय.
बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते.
चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. पुसदहुन अकोल्याकडे एसटी बसला भीषण आग लागल्या घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार ही बस पुसद-अकोला एसटी बस होती, आणि त्या बसमधून ४३ प्रवासी प्रवास करत होते.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतला. ही दुर्घटना खंडाळा घाटात घडली. बस धावत असतानाच बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एसटी बसचा समोरील केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.