राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय का बदलला?

Suspension Of IAS Officer Devendra Singh Was Cancelled: चंद्रपूरमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आलेल्या आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन विधानसभेत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मागे घेण्यात आले.
MPCB Member Secretary and IAS officer M. Devendra Singh whose suspension was later revoked by the Maharashtra government after an apology in the Assembly
MPCB Member Secretary and IAS officer M. Devendra Singh whose suspension was later revoked by the Maharashtra government after an apology in the AssemblySaam Tv
Published On

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात माहिती दिली की, चंद्रपूरमधील पर्यावरणविषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने गैरहजर राहिले. यावेळी पंकजा मुंडे चांगल्याचा संतापल्या, माझ्या आदेशानंतरही IAS अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे ब्रीफीनगसाठी हजर राहिले नाही. या गंभीर विषयाची दखल घेत अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी विधानसभेत तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.

MPCB Member Secretary and IAS officer M. Devendra Singh whose suspension was later revoked by the Maharashtra government after an apology in the Assembly
Sunetra Pawar: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी, प्रसुती रजेबाबात सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा

निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी

सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिले. एमपीसीबीचे अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे निलंबनाचे निर्देश रद्द करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निर्देशानुसार निलंबन मागे घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

MPCB Member Secretary and IAS officer M. Devendra Singh whose suspension was later revoked by the Maharashtra government after an apology in the Assembly
Sambhajinagar : ठाकरे गटाच्या नेत्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ

एम.देवेंद्र सिंग हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे संबंधित आदेशात म्हटले आहे. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने ही कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com