How to refill gas cylinder instantly
How to refill gas cylinder instantlySaam

आता ATM मधून मिळणार गॅस, रिकामं सिलेंडर आणा आणि भरून घ्या, वाचा नेमकं सत्य

LPG Gas ATM India : एलपीजी गॅस एटीएममधून फक्त 3 मिनिटांत सिलेंडर भरता येतो का? व्हायरल व्हिडिओची सत्यता, गुरुग्राममधील बीपीसीएल गॅस एटीएमची संपूर्ण माहिती आणि महाराष्ट्रात ही सुविधा कधी सुरू होणार याचा सविस्तर आढावा.
Published on

How to refill gas cylinder instantly : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता एटीएममधून गॅस मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...रिकामी टाकी आणून गॅस भरणं शक्य होणाराय...पण, खरंच असं गॅस एटीएम आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात..

आता गॅसचं टेन्शन कायमचं मिटणार आहे...कारण, आता गॅसचंही एटीएम आलंय...फक्त 3 मिनिटात तुम्ही गॅस मिळवू शकता...असा दावा करण्यात आलाय...सध्या देशभरात गॅस टंचाई झालीय...त्यामुळे गॅससाठी लोकांनी रांगा लावल्यायत...पण, खरंच एटीएममधून गॅस मिळणं शक्य आहे का...? असं एटीएम कुठे आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

How to refill gas cylinder instantly
मोठी बातमी! पेट्रोल पंपावर आता केरोसीन मिळणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, वाचा

देशात LPG एटीएमची सुरूवात झालीय...रिकामी टाकी आणा आणि फक्त 3 मिनिटांत गॅस भरून घ्या...असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय...हा दावा खरा असेल तर गॅस टंचाईच्या संकटात कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळेल...त्यामुळे खरंच महाराष्ट्रात गॅस एटीएम कुठे आहेत...? गॅस एटीएम असेल तर त्याचा वापर कसा करायचा...? याची आम्ही मिळवणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

साम इन्व्हिस्टिगेशन

हरियाणातील गुरुग्राममध्ये BPCLने LPG एटीएम सुरू केलंय

ऑटोमॅटिक एलपीजी वेंडिंग सिस्टिम लावण्यात आलीय

रिकामे सिलेंडर आणून ग्राहकांना ते भरून घेता येईल

एटीएममधून कंम्पोझिट सिलेंडरमध्येच गॅस भरला जाईल

गॅस भरण्यासाठी 3 मिनिटांचा कालावधी लागेल

How to refill gas cylinder instantly
Raj Thackeray : राजगर्जना...मोदींवर ठाकरे शैलीत वार, म्हणाले याची किंमत मोजावीच लागेल

हे गॅस एटीएम महाराष्ट्रात अजून सुरू झालेलं नाही...मात्र, लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे...गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी ग्राहकाला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल...त्यानंतर एक ओटीपी येईल...तो एटीएम मशीनच्या की बोर्डवरून टाईप करून नोंदवावा लागेल...त्यानंतर एक क्युआर कोड येईल...तो UPI पेमेंटद्वारे स्कॅन करून पेमेंट करता येईल...या एलपीजी एटीएमवर लोखंडी गॅस टाकी नाही फक्त कंम्पोझिट सिलेंडरचा वापर करता येईल...त्यामुळे आमच्या पडताळणीत गॅस एटीएम आल्याचा दावा सत्य ठरलाय.

How to refill gas cylinder instantly
हाच तो चेहरा! संगमनेरमधील त्या चिमुरडीचा आयुष्य उद्ध्वस्त करणारा नराधम; पाहा रेखाचित्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com