हाच तो चेहरा! संगमनेरमधील त्या चिमुरडीचा आयुष्य उद्ध्वस्त करणारा नराधम; पाहा रेखाचित्र
Acid Attack in Sangamner : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात इसमाने ॲसिड फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. १७ मार्च रोजी ही मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला थांबवले आणि तिच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूला ॲसिड फेकले.
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शोध पथक आणि फॉरेन्सिक युनिटकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने संशयित आरोपीचे रेखाचित्र (Sketch) जारी केले आहे. आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
