Liquor Ban : सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

Liquor ban : पश्चिम बंगालमध्ये सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
Liquor ban in west bengal
Liquor banSaam tv
Published On
Summary

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत्या मतदानासाठी सज्ज

मतदानाच्या पार्श्वभूमीवर ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार

निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग 4 दिवस दारूचे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात दारू विक्रीचे प्रमाण वाढते. त्यामुळे दारूचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा पश्चिम बंगालमध्ये दारूच्या विक्रीत असामान्य वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक काळात २ ऐवजी ४ दिवस दारूचे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Liquor ban in west bengal
सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, निवडणूक बारामतीची, चर्चा मुख्यमंत्रिपदाची

निवडणूक आयोगाने म्हटलं की, 'मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या एप्रिल महिन्यात डब्ल्यूबीएसबीसीएलच्या डेपोंमधून किरकोळ विक्रेत्यांच्या पॅकेज्ड दारू विक्रीत अचानक वाढ झाली आहे. तसेच दारूच्या दुकानातही वाढ झाली आहे'. आयोगाने पुढे म्हटलं की, 'मद्यपान देखरेख उपक्रम आणि इतर घटकांचे मूल्यांकन करण्यात आलं आहे. त्यानंतर मद्यविक्रीवरील बंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंदा तृणमूल काँग्रेसला भाजपचं आव्हान असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी गुरुवारी २३ एप्रिल रोजी मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल.

Liquor ban in west bengal
राहुरी पोटनिवडणुकीची जबाबदारी २ तरूण नेत्यांवर; CM फडणवीसांनी थेट नावेच केली जाहीर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं की, 'बंगालमध्ये निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच कामात कोणतीही कसर सोडणार नाहीत'. निवडणूक आयोग भाजपला मदत करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. परंतु निवडणूक आयागोने आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com