स्व. शिवाजी कर्डीले हे जनतेचा माणूस होते. कुणाला नेता बनवायचे आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, हे त्यांना ठाऊक होते. जनतेची सेवा करताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा केली नाही. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे. मात्र राहुरीच्या विकासासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथे केले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, बारामती आणि राहुरीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची अपेक्षा होती. आर. आर आंबांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता. याच भावनेतून मी प्राजक्त तनपुरे यांना फोन केला होता आणि त्यांनी माझे म्हणणे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
समुद्रात वाहून जाणारे 85 TMC पाणी दुष्काळी भागात वळवून नाशिक, नगर आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करणार. राहुरीच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे शिवाजी कर्डिलेंचे स्वप्न पूर्ण करणार. तसेच जिल्ह्यांत संरक्षण प्रकल्पासाठी जागा दिली जा आहे. MIDC च्या माध्यमातून तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, मी अक्षय कर्डिले यांना राज्याच्या तिजोरीचा 'बेअरर चेक' देऊन चाललो आहे, राहुरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही कर्जमाफी प्रत्यक्षात अमलात येईल. तसेच, 'लाडकी बहीण योजना' कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी बिल आणले, मात्र महात्मा फुले आणि आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांनीच या कायद्याला विरोध केला, हे दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवाजी कर्डिले यांच्यावर जेवढे प्रेम केले, त्याच्या दीडपट प्रेम अक्षयवर करा. सुजय विखे आणि संग्राम जगताप हे दोन युवा नेते ही निवडणूक समर्थपणे हाताळत असून त्यांच्यावर मी ही जबाबदारी दिली आहे. उन्हाची तमा न बाळगता प्रत्येकाने मतदानाला बाहेर पडावे अशी विनंती फडणवीसांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.