धक्कादायक! पोलीस स्टेशनमध्येच कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्याचार; ३ पोलीस निलंबित

police custodial assault case : कॅन्सरग्रस्त तरुणावर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि मारहाण झाल्याचा गंभीर आरोप. प्रकरण उघड होताच तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे.
Crime
CrimeSaam tv
Published On

रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये घडली आहे. नाकाबंदी दरम्यान झालेल्या किरकोळ वादानंतर एका ३० वर्षांच्या कॅन्सरग्रस्त तरुणाला पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली, इतकेच नव्हे तर त्याच्या आजाराची थट्टा उडवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार (Unnatural Sexual Act) केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तिन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

चेहरा झाकल्याच्या किरकोळ कारणावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान चेहरा कापडाने झाकल्याच्या कारणावरून पोलिसांशी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या ३० वर्षीय तरुणाला लाडवा पोलीस ठाण्यात आणले. पीडित तरुणाने आपण 'बोन कॅन्सर' म्हणजेच हाडांच्या कर्करोगाचे रुग्ण असल्याचे पोलिसांना वारंवार सांगितले, पण नराधम पोलिसांना त्याची दया आली नाही. त्याच्या आजाराची थट्टा उडवत पोलिसांनी त्याला आधी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीत, तर पोलीस ठाण्याच्या आतच त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्यामुळे पीडित तरुणाची तब्येत खालावली असून, त्याला कुरुक्षेत्रच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Crime
Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

३ पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड

हे प्रकरण समोर येताच कुरुक्षेत्रचे पोलीस अधीक्षक चंदर मोहन यांनी तातडीने पावले उचलत, आरोपी एएसआय संजीव कुमार, एएसआय राजेंद्र कुमार आणि होमगार्ड सुमित यांना निलंबित केले आहे. या तिघांवरही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, चौकशीसाठी 'SIT' म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये मारहाण आणि गैरवर्तनाचे आरोप असून, एसआयटी अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या आरोपाचीही सखोल चौकशी करेल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Crime
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

पीडिताचा जबाब देण्यास नकार

दरम्यान, एसआयटीचे प्रमुख असलेले डीएसपी निर्मल सिंग यांनी सांगितले की, तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. मात्र, संबंधित पीडित व्यक्तीने सध्यातरी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास आणि एसआयटीसमोर आपला अधिकृत जबाब नोंदवण्यास नकार दिला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

Crime
ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com