राज्याला मिळाले नवीन मुख्यमंत्री; लोकभवनात पार पडला शपथविधी, 14 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

DK Shivakumar Sworn In As New Chief Minister Of Karnataka 2026: कर्नाटकच्या राजकारणात मोठा बदल झाला असून डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. लोकभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात 14 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
DK Shivakumar takes oath as the new Chief Minister of Karnataka during a grand ceremony at Lok Bhavan Glass House.
DK Shivakumar takes oath as the new Chief Minister of Karnataka during a grand ceremony at Lok Bhavan Glass House.saam tv
Published On

कर्नाटक राज्यात आजपासून नव्या पर्वाची सुरुवात झाली असून डी.के शिवकुमार (DK Shivakumar) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊली आहे. लोकभवन येथील ग्लास हाऊसमध्ये हा शपथविधी पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या सरकारमध्ये 14 मंत्र्यांनी शपथ घेतली. काही दिवसांपूर्वी सिद्धरामाया यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर डी.के शिवकुमार यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. तसेच जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

DK Shivakumar takes oath as the new Chief Minister of Karnataka during a grand ceremony at Lok Bhavan Glass House.
Government Employees: सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशी दौऱ्यावर निर्बंध, वर्षभर प्रवास करता येणार नाही

मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची पार्श्वभूमी

कर्नाटकचे १८ वे मुख्यमंत्री झाले.

वोक्कालिगा समुदायातून आलेले आहेत.

ते सिद्धरामय्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

ते २०२० पासून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

ते १९८९ पासून एकही निवडणूक हरलेले नाहीत.

ते १९८९ ते २००८ पर्यंत सतानूरचे आमदार होते.

२००८ पासून कनकपूर मतदारसंघाचे सलग आमदार.

काँग्रेस पक्षात त्यांना संकटमोचक मानले जाते.

DK Shivakumar takes oath as the new Chief Minister of Karnataka during a grand ceremony at Lok Bhavan Glass House.
देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची पार्श्वभूमी

कर्नाटकचे सर्वात प्रभावशाली दलित नेते.

ते सिद्धरामय्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.

ते मधुगिरी आणि कोराटागेरे मतदारसंघातून अनेक वेळा आमदार होते.

२०१८ मध्ये ते कर्नाटकचे पहिले दलित उपमुख्यमंत्री बनले.

२०१५ मध्ये कर्नाटकचे गृहमंत्री झाले.

ते २०१० ते २०१८ पर्यंत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष होते.

DK Shivakumar takes oath as the new Chief Minister of Karnataka during a grand ceremony at Lok Bhavan Glass House.
Earthquake Video : भूकंपाने जमीन थरथरली; १३ इमारती कोसळल्या, थरारक व्हिडिओ

डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे:

के.एच. मुनियप्पा

के.जे. जॉर्ज

एम. बी. पाटील

रामलिंगा रेड्डी

सतीश जारकिहोली

प्रियांक खर्गे

यूटी खादर

ईश्वर खांद्रे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com