कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu passes away : झारखंडचे कॅबिनेट मंत्री आणि जेएमएमचे ज्येष्ठ नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गिरिडीह येथील निवासस्थानी प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले होते.
Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu passes away
Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu passes awaySaam TV
Published On

JMM leader and Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu death : झारखंडचे कॅबिनेट मंत्री आणि 'झारखंड मुक्ती मोर्चा' (JMM) चे ज्येष्ठ नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गिरीडीह येथील राहत्या घरी मध्यरात्री सुदिव्य कुमार सोनू यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात जाण्याने झारखंडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण राज्यात शोकाकूल वातावरण पसरले आहे.

झारखंडमध्ये शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) ज्येष्ठ नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गिरिडीह येथील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu passes away
मुंबईत‘स्पेशल २६’ चित्रपटासारखा थरार! आयकर अधिकारी बनून कोट्यवधींची खंडणी, ६ जणांच्या टोळीचा पर्दाफाश

मंत्री सुदिव्य यांची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की, त्यांना चांगल्या उपचारांसाठी रांचीला नेता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच, गिरिडीह प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्र्यांचे समर्थक रुग्णालयाकडे धावले. मंत्र्यांच्या निधनाच्या बातमीने जेएमएम कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

सुदिव्य कुमार सोनू सध्या गिरिडीह विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा गिरिडीह मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे पर्यटन, कला, संस्कृती, क्रीडा, युवा व्यवहार या विभागांसोबतच नगरविकास आणि उच्च, तंत्रशिक्षण विभागांचीही जबाबदारी होती.

Jharkhand Minister Sudivya Kumar Sonu passes away
Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना गांडे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून देण्यात मंत्री सोनू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे म्हटले जाते. तसेच, जेपीएससी आणि सीजीएल परीक्षेच्या निकालातील गैरप्रकारांविरोधात अलीकडे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाटाघाटी घडवून आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com