Maharashtra weather forecast today : राज्यात सध्या तरी मोठा पाऊस येण्याची चिन्हं नाहीत, फक्त काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे विजांसह हलक्या सरी कोसळू शकतात. ऐन खरिपाच्या काळात पावसाची उघडीप वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात मोठा किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. पण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धुळे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, जालना आणि हिंगोली या भागांतही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावू शकतात.
पाऊस का गायब झाला?
सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता हळूहळू ओसरत चालली आहे. मॉन्सूनचा मुख्य पट्टा महाराष्ट्रापासून उत्तर भारताकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बहुतांश भागात कडक ऊन आणि अधूनमधून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
नाशिक, धुळे आणि नांदेड जिल्ह्यांत आज आणि उद्या विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या सरी, तर उर्वरित महाराष्ट्रात कोरडे किंवा ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर यवतमाळमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.