VIDEO : पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, जम्मू-सांबा-पठाणकोटला टार्गेट, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

Jammu Kashmir Blackout : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जम्मू काश्मीर, राजस्थानमध्ये ब्लॅकआऊट घेण्यात आलेय. पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताने हाणून पाडला आहे.
Jammu Kashmir Blackout
Jammu Kashmir Blackout Saam Tv News
Published On

Jammu Kashmir Blackout : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला करत नापाक हरकत केली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानकडून सीमेवरील भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. जम्मू, पंजाब, पठाणकोट, राजस्तान, अमृसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या ठिकाणी सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआऊट करण्यात आलेय. राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. भारताने पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडले. पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखले आहेत.

जम्मू-सांबा-पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ले

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री जम्मू, सांबा आणि पठाणकोट सेक्टरमध्ये ड्रोन हल्ला करण्याा प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने या ड्रोनना यशस्वीपणे रोखले. जम्मू, सांबा, अखनूर आणि पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. या भागात सायरन आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पाकड्यांकडून ड्रोन हल्ला -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू, सांबा आणि पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले. हे ड्रोन सैन्य ठिकाणे आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचे समोर आलेय. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक पद्धतीने अनेक ड्रोन पाडले. हे ड्रोन तुर्कीचे असल्याचे समोर आलेय.

संपूर्ण ब्लॅकआऊट अन् स्फोटाचे हादरे

जम्मू, अखनूर, सांबा, राजस्थान, आणि फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आला आहे. सायरन आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांबा आणि जम्मूमध्ये भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने ड्रोन रोखताना स्फोट झाले. यामुळे काही सैनिक जखमी झाल्याची माहिती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com