Security Forces in Kashmir : काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु

Security Forces in Kashmir News : काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.
काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु
jammu and kashmir News ANI
Published On

नवी दिल्ली : उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. बांदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

बांदीपोराच्या अरागम भागात रविवारी उशिरापर्यंत चकमक सुरु होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी बांदीपोरा भागाला चारी बाजूंनी घेरून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. ड्रोनच्या मदतीने एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. मृत दहशतवाद्याजवळ एम ४ रायफल देखील पाहायला मिळाली.

काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु
VIDEO: एलन मस्कचा EVM वर संशय, AI द्वारे EVM हॅक होण्याचा धोका

काश्मीरच्या बंदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल काश्मीरबाबत बैठक घेतली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरु आहेत.

जम्मू भागातही दहशतवादी हल्ल्याच्या एका पाठोपाठ चार घटना घडल्या. यानंतर भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान हे या स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच या पार्श्वभूमीवर बैठकही घेणार आहेत.

दहशतवाद्यांचा भाविकांच्या बसवर हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ९ जून रोजी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला केला. दहशतवाद्यांनी सांयकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास केला. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. बेछुट गोळीबारानंतर बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस दरीत कोसळली.

काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु
Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश

कठुआ भागातील चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कठुआ गावांत मंगळवारी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com