Mass shooting at America : अमेरिका पुन्हा हादरलं! वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार; २ लहान मुले ठार, १० जखमी

Mass shooting at America water park : अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं. अमेरिकेतील वॉटरपार्कमध्ये झालेल्या गोळीबारात २ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिका पुन्हा हादरलं! वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार; २ लहान मुले ठार, २ जखमी
Mass shooting at AmericaSaam tv
Published On

नवी दिल्ली : अमेरिका पुन्हा एकदा गोळीबारानं हादरलं आहे. अमेरिकेतील डेट्राइट शहरात शनिवारी एका वॉटरपॉर्कमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या बेछुट गोळीबारात २ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. रोचेस्टर हिल्सच्या चिल्ड्रन वॉटरपार्कमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ऑकलँड काऊंटीचे शेरिफ मायकल बाऊचर्ड यांनी सांगितलं की, एकाने मिशिगनमधील वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार केला. त्यानंतर तो एका घरात लपला. पोलिसांनि त्याला घेरलं. मात्र, तो घरात मृत अवस्थेत आढळला. या गोळीबाराच्या घटनेमुळे लहान मुले आणि अन्य लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमेरिका पुन्हा हादरलं! वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार; २ लहान मुले ठार, २ जखमी
Russia Vs Sweden : स्वीडनमध्ये घुसली रशियाची बॉम्बर लढाऊ विमानं; NATO हाय अलर्टवर, पहा Video

ऑकलँड काऊंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती वॉटरपार्कमध्ये आला. त्याने कारमधून उतरल्यानंतर त्याने गोळीबार सुरु केला.

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने ३० राऊंड फायर केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एका बंदूक आणि तीन रिकाम्या मॅगजीन जप्त केल्या आहेत. या बदुंकीतून गोळीबार केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

अमेरिका पुन्हा हादरलं! वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार; २ लहान मुले ठार, २ जखमी
Uttarakhand Accident: भाविकांनी भरलेला टेम्पो नदीत कोसळला, ८ जणांचा जागीच मृत्यू तर १५ जखमी

या घटनेनंतर पोलिसांनी वॉटरपार्क बंद केलं आहे. या ठिकाणी अद्याप भीती कायम असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाला चार बाजूंनी घेरलं आहे. या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती असल्यास कळवण्याची विनंती पोलिसांनी स्थानिकांना केली आहे.

अमेरिका पुन्हा हादरलं! वॉटरपार्कमध्ये बेछुट गोळीबार; २ लहान मुले ठार, २ जखमी
America- Russsia: अमेरिका अन् रशियात शाब्दिक युद्ध; टीका करताना बायडन यांची पुतीन यांना शिवीगाळ

गवर्नर ग्रेचेन व्हिटमरने एक्सवर पोस्ट करत स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. दरम्यान, रोचेस्टर हिल्सपासून १५ किलो मीटर दूर ऑक्सफॉर्डमध्ये २०२१ साली गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com