Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश

Kerala Matrimony: केरळ मॅट्रोमोनी साइटला तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. हे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश
Kerala MatrimonySaam Tv
Published On

लग्नासाठी चांगला मुलगा अथवा मुलगी शोधण्यासाठी आजकाल तरुण पीढी मॅट्रोमोनी साइटचा वापर करतात. देशभरामध्ये मोठ्यासंख्येने मॅट्रोमोनी साइट्स आहेत. या साइट्सवर मुलगी अथवा मुलगा शोधण्यासाठी पैसे द्यावे लागतात. बऱ्यातदा या साइट्सच्या माध्यमातून चांगला मुलगा किंवा मुलगी शोधण्यात अपयश येते. या साइट्ससुद्धा बऱ्याचदा चांगला मुलगा किंवा मुलगी शोधून देण्याचे आश्वासन देत हजारो रुपये फी घेतात. पण त्यांना देखील ते शोधून देता येत नाही. अशाच एका मॅट्रोमोनी साइटविरोधात एका तरुणाने ग्राहक संरक्षण न्यायालयात धाव घेतली. या तरुणाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या मॅट्रोमोनी साइटला तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

एर्नाकुलम जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (डीसीडीआरसी) केरळ मॅट्रोमोनी साइटला एका तरुणाला २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चांगलली मुलगी शोधून देण्यास अपयशी ठरल्याप्रकरणी एका तरुणाने या मॅट्रोमोनी साइटविरोधात तक्रार दाखल केली होती. जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाचे अध्यक्ष डी बी बिनू आणि सदस्य रामचंद्रन व्ही आणि श्रीविधिया टीएम यांनी १५ मे रोजी याप्रकरणावर सुनावणी करत असताना केरळ मॅट्रोमोनी साइटच्या कामात कमतरता असल्याचा निष्कर्ष काढत हे आदेश दिले आहेत.

Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश
Patana Boat Capsizes: गंगा स्नान करायला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १७ जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

या प्रकरणावर बोलताना जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने सांगितले की, तक्रारदार तरुण विवाहविषयक वेबसाइटच्या अनेक बळींपैकी एक होता. मॅट्रोमोनी साइटने आकर्षक डिस्पेद्वारे तरुणाचे लक्ष वेधून घेतले. पण त्याला आवश्यक असलेल्या सेवा पुरविल्या नव्हत्या आणि या साइटने तक्रारदाराला वचन दिलेली सेवा पुरविल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराचे आपल्या युक्तिवादाला पुष्टी देण्यासाठी सोशल मीडियावरून जनमत तयार केले त्यामुळे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की विरुद्ध पक्षाच्या अनेक पीडितांपैकी तक्रारदार हा एकच आहे.'

Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश
Delhi High Court : व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवा! CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश

केरळच्या चेरथला येथे राहणाऱ्या तरुणाने मे २०१९ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्याने ग्राहक मंचाला सांगितले की, त्याने सुरूवातीला २०१८ मध्ये केरळ मॅट्रोमोनीच्या वेबसाइटवर त्याचा बायोडाटा टाकला होता. त्यानंतर केरळ मॅट्रोमोनी साईटच्या प्रतिनिधीने त्याला संपर्क केला. त्यांनी त्याला चांगली मुलगी शोधण्यासाठी तीन महिन्यांची फी ४,१०० रुपये देण्यास सांगितले. तरुणाने या मॅट्रोमोनी साइटकडून चांगल्या मुलींच्या प्रोफाइल मागितल्या होत्या. पण फी भरल्याशिवाय या मुलींच्या डिटेल्स देऊ शकत नाही असे सागितले.

Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश
Mumbai Water Storage: मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; भातसा तलावात फक्त २२ टक्के पाणीसाठा शिल्लक, जलसाठ्यात होतेय वेगाने घट

तक्रारदार तरुणाने पुढे सांगितले की, त्याने शेवटी जानेवारी २०२९ मध्ये मॅट्रोमोनी साइटवर वधू शोधण्यासाठी पैसे भरले. फी भरल्यानंतर त्याने मॅट्रोमोनी साइटला संपर्क करण्याचा आणि कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून उत्तर आले नाही. त्याचसोबत त्याला चांगल्या मुलींच्या प्रोफाइल शोधण्यास देखील त्यांच्याकडून काहीच मदत झाली नाही. त्यामुळे निराश होऊन या तरुणाने दिलेली फी परत मिळावी यासाठी ग्राहक संरक्षण न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सुनावणी करताना न्यायालयाने केरळ मॅट्रोमोनी साइटला २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तरुणाला दिलेल्या आश्वासनानुसार आणि त्याला आवश्यक असलेली सेवा पूरवण्यात केरळ मॅट्रोमोनी साइट अयशस्वी झाली असल्याचे देखील न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

Kerala News: नवरी शोधून देण्यात अयशस्वी, तरुणाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या; मॅट्रिमोनी साइटला कोर्टाचे आदेश
Pune Viral Video : पुण्यात तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; हातसोडून चालवली धावती दुचाकी, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com