व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवा! CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश
Sunita and Arvind KejriwalSAAM TV

Delhi High Court : व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवा! CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश

Delhi High Court Directs Sunita kejriwal : सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून कोर्टातील सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने सुनीता केजरीवाल यांना दिले.
Published on

नवी दिल्ली :

मद्यधोरणातील कथित घोटाळा प्रकरणाशी संबंधित कोर्टातील सुनावणींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावरून हटवण्यात यावेत, असे आदेश दिल्ली हायकोर्टानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिले आहेत.

२८ मार्च रोजी दिल्ली हायकोर्टात मद्यधोरण प्रकरणाशी संबंधित सुनावणी झाली होती. त्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली होती. ती सुनीता केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केली होती. ते व्हिडिओ हटवण्यात यावेत, असे निर्देश हायकोर्टाने शनिवारी सुनीता केजरीवाल यांना दिले.

व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवा! CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश
Arvind Kejriwal : 'मी तुरुंगात असो किंवा बाहेर...'; पत्नी सुनीता यांनी वाचून दाखवला CM केजरीवाल यांचा संदेश

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे सुनावणीदरम्यान काहीतरी बोलताना या व्हिडिओत दिसत आहेत. न्यायाधीश नीना बन्सल आणि अमित शर्मा यांच्या खंडपीठानं उल्लंघनाचे आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनीता केजरीवाल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह सहा जणांना नोटीस बजावली होती. त्याचवेळी या प्रकरणी पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होईल, असे कोर्टाने सांगितले.

सुनीता केजरीवालांनी व्हिडिओ केला रिशेअर

अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी केजरीवाल हे विशेष न्यायाधीशांसमोर (पीसी अॅक्ट) आपली बाजू मांडत होते. त्याची ऑडिओ/ व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सुनीता केजरीवाल यांनी एका अन्य अकाउंटवरून पोस्ट केलेले व्हिडिओ रिट्विट केले होते.

व्हिडिओ रेकॉर्डिंग हटवा! CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश
Arvind Kejriwal: 'मी देश वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे', अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात केलं आत्मसमर्पण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com