Arvind Kejriwal : 'मी तुरुंगात असो किंवा बाहेर...'; पत्नी सुनीता यांनी वाचून दाखवला CM केजरीवाल यांचा संदेश

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. सध्या अरविंद केजरीवाल हे सहा दिवसांच्या ईडी कोठडीत आहेत. ईडीने मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांशी संवाद साधला.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Saam tv

Arvind Kejriwal Latest News :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. सध्या अरविंद केजरीवाल हे सहा दिवसांच्या ईडी कोठडीत आहेत. ईडीने मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संदेश पत्नी सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवला. (Latest Marathi News)

अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचताना सुनीता यांनी म्हटलं की, 'माझ्या प्रिय नागरिकांनो, मला अटक करण्यात आली आहे'.

'मी तुरुंगात असो किंवा बाहेर... प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहील. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझ्या शरीराचा एक-एक भाग देशासाठी आहे. या पृथ्वीवर माझं जीवन संघर्षासाठी आहे. म्हणून या अटकेमुळे आश्चर्यचकीत झालो नाही. मी मागच्या जन्मात चांगले पुण्य केले असतील, यामुळे माझा जन्म भारतासारख्या महान देशात झाला आहे. आपल्याला मिळून भारताला महान करायचं आहे. देशाच्या आत आणि बाहेर काही शक्ती आहेत, त्या देशाला कमकुवत करत आहेत', असे त्यांनी सांगितलं.

Arvind Kejriwal
Jalna Lok Sabha: रावसाहेब दानवेंना शह देण्यासाठी 'मविआ'चा मास्टर प्लान; जालन्यातून तगडा उमेदवार देणार

'सुनीता यांनी पुढे म्हटलं की, 'आपल्या या शक्तीला ओळखलं पाहिजे. या शक्तीचा पराभव केला पाहिजे. तर दुसरीकडे भारत देशाला पुढे नेणाऱ्या काही शक्ती आहेत.. त्यांना मजबूत करायचं आहे'. मुख्यमंत्र्यांचा संदेश वाचताना सुनीता यांनी पुढे म्हटलं की, 'दिल्लीतील माझ्या आई-बहिणी विचार करत असेल की, मी तुरुंगात गेलोय, त्यामुळे १००० रुपये मिळणार की नाही? तुमच्या भाऊ आणि मुलाला तुरुंगात ठेवणारं असं कोणतंही तुरुंग नाही. मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. तुमच्या सर्वांचं आश्वासन पूर्ण करेल. मी आतापर्यंत सर्व आश्वासन पूर्ण केले आहे. तुमचा भाई आणि मुलगा पोलादी आहे. माझी विनंती आहे की, तुम्ही मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थन करा'.

Arvind Kejriwal
Loksabha Election 2024: गुजरातमध्ये भाजपला धक्का! २ बड्या नेत्यांनी उमेदवारी नाकारली; निवडणूक लढण्यास नकार

'आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की, लोक सेवेचं थांबलं नाही पाहीजे. भाजपवर घृणा करू नका. भाजपचे लोकही आपले भाऊ-बहीणच आहे. मी लवकरच बाहेर येईल, असे त्यांनी पुढे सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com