मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट
Rajasthan High Court NewsSaam TV

Rajasthan High Court News : मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट

Rajasthan High Court on Physical Harassment : मुलीची अंतर्वस्त्रे उतरवणे आणि स्वतःचे कपडे काढणे हा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न मानला जाणार नाही, अशी टिप्पणी राजस्थान हायकोर्टाने केली.
Published on

मुलीची अंतर्वस्त्रे उतरवणे आणि स्वतःचे कपडे काढणे हा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न मानला जाणार नाही. आयपीसीच्या कलम 376 आणि कलम 511 नुसार हा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ठरत नाही, अशी टिप्पणी राजस्थान हायकोर्टाने केली. परंतु आरोपीने असे कृत्य केल्यास कलम 354 अंतर्गत त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

 मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट
Delhi High Court: महिलेच्या संमतीने शारीरीक संबंध ठेवल्यास बलात्काराचा आरोप होत नाही; दिल्ली हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

काय आहे प्रकरण?

राजस्थान येथील एका २५ वर्षीय तरुणाची परिसरातील ६ वर्षीय चिमुकलीवर वाईट नजर पडली. त्याने बलात्कार करण्याच्या हेतूने तिला गोड बोलून आपल्या घरी नेलं. आरोपीने चिमुकलीच्या अंगावरील सर्व कपडे उतरवले. यावेळी त्याने स्वत:चे कपडे देखील काढले. पण त्याचवेळी मुलीने आरडाओरड केली.

तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आरोपीच्या घरात आले. नागरिकांनी तरुणाला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अडीच महिन्यांपासून आरोपी तुरुंगात होता.

यादरम्यान त्याने हायकोर्ट याचिका दाखल केली. यावर राजस्थान उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनुप कुमार धांड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने काही टिप्पणी केल्या. मुलीची अंतर्वस्त्रे उतरवून स्वत:चे कपडे काढणं हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा मानला जात नाही, असं न्यायमूर्ती म्हणाले.

न्यायमूर्ती अनुप म्हणाले, "बलात्काराचा प्रयत्नाच्या गुन्ह्यासाठी तीन कृत्या कराव्या लागतात. प्रथम, गुन्हा करण्याचा आरोपीचा हेतू असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, आरोपीने यादरम्यान एक कृती केलेली हवी. तिसरे म्हणजे, त्या कृतीने गुन्हा पूर्ण व्हायला हवा. तसे नसेल तर ते बलात्कार प्रकरणाच्या कक्षेत येणार नाही.

आरोपीने ज्या कृती केल्या, त्यानुसार त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही. पण कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

 मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट
Calcutta High Court : सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हटल्यास होऊ शकते तुरुंगवारी; जाणून घ्या हायकोर्टाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com