Delhi High Court: महिलेच्या संमतीने शारीरीक संबंध ठेवल्यास बलात्काराचा आरोप होत नाही; दिल्ली हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Physical Abused: लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने आरोपी व्यक्तीवरील बलात्काराचा खटला फेटाळून लावला आहे. आपण काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊ या.
Court News
Delhi High CourtYandex

Physical Abuse Cannot Be Charged After Consensual Relationship

महिलेने सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अत्याचाराचा आरोप करू शकत नाही. तसेच त्याने लग्नाचे आश्वासनही दिलं नसेल, तर महिला आरोप करू शकत नाही. अशी लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने आरोपी व्यक्तीवरील बलात्काराचा खटला फेटाळून लावला आहे. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांनी एका पुरुषावरील बलात्काराचा खटला फेटाळताना (Physical Abuse) ही टिप्पणी केली. हे प्रकरण दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने सोडवण्यात आलं (Consensual Relationship) होतं. दोघांचंही आता लग्न झालं आहे. आता हे प्रकरण काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायालयाने असं निरीक्षण नमूद केलं आहे की, जेव्हा एखादी स्त्री जाणूनबुजून शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेते. तेव्हा ती त्याचे परिणाम पूर्णपणे समजून घेते. त्यामुळे तिची संमती फसवणुकीने मिळवली गेली, असं मानले जाऊ शकत नाही. तिची संमती ही वस्तुस्थितीच्या गैरसमजावर आधारित आहे, असं स्पष्ट पुरावे असल्याशिवाय म्हणता येणार (Physical Abuse News) नाही.

महिलेने दाखल केलेला बलात्काराचा खटला फेटाळताना न्यायाधीश मेंदिरट्टा यांनी ही टिप्पणी केली. यामध्ये आरोपीने लग्नाच्या बहाण्याने तक्रारदार महिलेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यास असमर्थता व्यक्त (Court News) केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Court News
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

एका महिलेने एका पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली होती. लग्नाच्या बहाण्याने या तरुणाने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेने केला होता. मात्र, नंतर कौटुंबिक दबावाचं कारण देत त्याना लग्नाचं वचन नाकारलं होतं. त्यानंतर या जोडप्याने त्यांच्यातील मतभेद मिटवले. त्यांनतर त्यांना कायदेशीररित्या विवाह केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

आरोपी आणि तक्रारदार यांनी एकमेकांशी लग्न करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी कोर्ट मॅरेज केले. तक्रारदाराने न्यायालयाला सांगितलं की, ती त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहात आहे. चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या एफआयआरचा पाठपुरावा करू इच्छित नाही. घरच्यांच्या विरोधामुळे आरोपीला महिलेशी लग्न करण्यात अडचण येत होती. न्यायालयाने असं नमूद केलं की, याचिकाकर्ता आणि प्रतिवादी क्रमांक 2 यांच्यातील संबंधांचे स्वरूप लक्षात घेता, असं कोणतेही कथित वचन दुर्भावनापूर्ण हेतूने किंवा प्रतिवादी क्रमांक 2 ची फसवणूक करण्यासाठी दिले गेलेले दिसत नाही. परंतु, नंतर जे काही झालं ते याचिकाकर्त्याच्या कुटुंबीयांमुळे घडलं.

Court News
Vijay Singh Revealed People Abuse: 'मला शिव्या दिल्या..', दोन वर्षांपासून बिग बॉसचा आवाज देणाऱ्या व्यक्तीला मिळताय धमक्या; नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com