El Nino : दुष्काळाचे सावट! भारतावर 'सुपर एल निनो'चं भयंकर संकट, मॉन्सूनचा पाऊस १४ टक्के कमी; हवामानात होणार मोठा बदल

El Nino Impact On Monsoon Update News : एल निनोचं संकट असतानाही भारतातील मान्सून सध्या सामान्य स्थितीत आहे. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान देशात १४ टक्के पावसाची तूट नोंदली असून पुढील काळातील पावसाकडे लक्ष लागले आहे.
EL Nino Draought In India Weather Update
EL Nino Draought In India Weather Update AI Image
Published On
Summary
  • एल निनोचा धोका असतानाही भारतातील मान्सून सामान्य

  • १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान देशात १४ टक्के पावसाची तूट

  • ईशान्य भारतात सर्वाधिक २६ टक्के पावसाची तूट

  • वायव्य भारतात ११ टक्के तूट

प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’ चा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. भारतामध्ये नैऋत्य मान्सूनच्या दृष्टीने ‘एल निनो’ महत्त्वाचा मानला जातो. साधारणपणे एल निनोच्या काळात भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते. मात्र, दरवेळी एल निनोमुळे देशात पाऊस कमीच पडतो असे नाही. समुद्रातील तसेच वातावरणातील इतर बदलांचा देखील मान्सूनवर परिणाम होतो. दरम्यान महाराष्ट्रातील पावसावर देखील एल निनोचं संकट घोंगावत आहे.परिणामी राज्यात पावसाची एंट्री लेट झाल्याने नागरिकांना घाम फुटला होता.

मात्र यंदा एल निनोचा धोका निर्माण झालेला असतानाही आतापर्यंत देशातील मान्सून तुलनेने समाधानकारक आहे. १ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत देशात सरासरी ६९४ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५९८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे देशातील पावसाची तूट १४ टक्के आहे. हवामान विभागानुसार २० टक्क्यांपेक्षा कमी तूट ही ‘सामान्य’ पावसाच्या श्रेणीत येते. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार मान्सून अद्याप सामान्य स्थितीत असल्याचे दिसून येते.

EL Nino Draought In India Weather Update
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

देशातील सुमारे ५६ टक्के भूभागावर सामान्य पाऊस, तर उर्वरित ४४ टक्के भागात पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. चार प्रमुख हवामान क्षेत्रांपैकी ईशान्य भारतात पावसाची तूट सर्वाधिक आहे. या भागात साधारण १,०७५ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ७९२ मिमी पाऊस झाला. परिणामी येथे २६ टक्के तूट नोंदली गेली. मात्र, ईशान्य भारतात सामान्यतः पावसाचे प्रमाण मोठे असल्याने टक्केवारीतील तूट अधिक दिसते.

EL Nino Draought In India Weather Update
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण पाहता परिस्थिती काही प्रमाणात समाधानकारक असल्याने या तुटीचा परिणाम तुलनेने मर्यादित राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले. येथे ४८० मिमीच्या तुलनेत ४२९ मिमी पाऊस झाला असून ११ टक्के तूट नोंदवण्यात आली. दुसरीकडे, मध्य भारतात मान्सूनची स्थिती तुलनेने चांगली राहिली आहे.मात्र, आगामी काळात अनेक दशकांतील तीव्र एल निनो स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने उर्वरित मान्सूनबाबत हवामान तज्ज्ञांची चिंता कायम आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांतील पावसाची स्थिती देशाच्या शेतीसह जलसाठ्यांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com