Operation Sindoor : १०० दहशतवाद्यांचा खात्मा, ९ दहशतवादी तळांवर हल्ला, कसाबचं ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त; सैन्य दलाकडून A टू Z माहिती, वाचा

Operation Sindoor inside Story : भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने कसाबचं ट्रेनिंग कॅम्प देखील उद्धवस्त केलं.
Operation Sindoor A to Z Story
Operation Sindoor A to Z StorySaam Tv News
Published On

भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली आहे. या युद्धविरामासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. युद्धविरामानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या सैन्य आणि दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मागील काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये यावेळी सैन्य दलाने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली.

तिन्ही सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकड्यांवर मोठी कारवाई केली. या पत्रकार परिषदेत सैन्य दलाने माहिती दिली की, भारताने पाकिस्तानच्या १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर हवाई दलाने दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राबवण्यात आलं होतं. ७ मे रोजी केलेल्या कारवाईत १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश आल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच कसाबने ट्रेनिंग घेतलेले कॅम्प देखील उद्धवस्त करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये तीन मोठे दहशतवादी मारले गेल्याची माहिती घई यांनी दिली.

Operation Sindoor A to Z Story
Beed News : बीडमध्ये आणखी किती संतोष देशमुख होणार, पवनचक्की कंपन्यांची पुन्हा दडपशाही सुरु? वाचा स्पेशल रिपोर्ट

घई पुढे म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्यानंतर तयार करण्यात आलं. दहशतवादी आणि त्यांचा तळांना उद्धवस्थ करण्यासाठी ऑपरेशन तयार करण्यात आलं. सीमेच्या पलीकडील दहशतवादी तळाची माहिती जाणून घेतली. मात्र, काही तळ आधीच रिकामे करण्यात आले होते. पुढे आम्हाला दहशतवाद्यांचे ९ तळ आढळले. यातील काही तळ पीओके आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आढळले. या तळाचं कनेक्शन मुरीदके, कसाब आणि डेव्हिड हेडलीसोबत आढळलं होतं'.

Operation Sindoor A to Z Story
Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

'आम्ही ७ मे रोजी केलेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदस्सिर अहमद या दहशतवाद्यांचा समावेश आहे. काही दहशतवादी पुलवामा हल्ल्याशी संबंधित होते. एलओसीवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यांनी लोकांची वर्दळ असणाऱ्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं, अशी माहिती त्यांनी दिली.

एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी म्हटलं की, 'आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची नव्हती. पण गरज पडली. भारतीय हवाई दलाने मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. दोन्ही तळे खूप आत होती. या तळांची हल्ला करण्यासाठी निवड करणे मोठी बाब होती. आयएएफने सॅटेलाइट आणि इंटेलिजन्सच्या माध्यमातून लक्ष्य निश्चित केलं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com