Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Fact Check women piolet : पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना भारतीय हवाई दलाची महिला पायलटला पाकिस्तानने पकडल्याचा दावा करण्यात आलाय...त्याचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच भारतीय महिला पायलट पाकच्या ताब्यात आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO
Published On

...हाच तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ व्हायरल करून पाकिस्तानने या महिला पायलटला पकडल्याचा दावा करण्यात आलाय...सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये जोरदार गोळीबार, मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले सुरू आहेत...त्यातच हा दावा करण्यात आल्याने खरंच ही महिला पायलटला पाकिस्तानच्या ताब्यात आहे का...? हा व्हिडिओ पाकिस्तानातील आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO
Jammu Drone Attack : पाकड्यांचा भारतावर हल्ला; गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे ८ जवान जखमी, घटनास्थळी स्थिती काय?

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आपला प्रत्येक जवान हा अत्यंत महत्त्वाचा आहे...जवानांमुळेच आपल्याला देशात सुरक्षित राहता येतं...त्यामुळे आपली हवाई दलाची महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...यासोबत एक मेसेजही व्हायरल करण्यात आलाय...त्यामध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO
India Pakistan Conflict : निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण; सुभेदार मेजर शहीद, दोन मुलं पोरकी

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट, स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंग यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आलंय'.

हा मेसेज आणि व्हिडिओ याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

महिला पायलटला पाकिस्तानने पकडल्याचा दावा खोटा

प्रो-पाकिस्तान सोशल मीडिया हॅन्डल्सवरून फोटो व्हायरल

पाकिस्तानकडून भारताबाबत अफवा पसरवली जातायत

अफवांमुळे देशासाठी नुकसान होऊ शकतं

Fact Check : पाकिस्ताननं पकडली भारतीय महिला पायलट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO
india pakistan Conflict : अमेरिकेची मध्यस्थी, चीनचा दबाव, पाकिस्तानचं नुकसान; शस्त्रसंधीनंतर भारताने काय करावं? VIDEO

सध्या पाकिस्तानच्या हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देतंय...पाकने उडवलेले ड्रोन, मिसाईल भारत उद्ध्वस्त करतंय...त्यामुळे आता पाकिस्तानकडून भारतीय सैन्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे...त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका...पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची रणनिती भारताने आखलीय...आमच्या पडताळणीत भारतीय हवाई दलाची महिला पायलट पाकने पकडल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com