India Pakistan Conflict : निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण; सुभेदार मेजर शहीद, दोन मुलं पोरकी

India Pakistan Conflict update : निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या शहीद होण्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली आहे.
India Pakistan tension :
India Pakistan Saam tv
Published On

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या ३ दिवसांपासून दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर आणि एअर स्ट्राइक केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये मिसाईल आणि ड्रोनसहित 'एलओसी'वरून गोळीबार होत आहे. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात राजौरी भागात तैनात असलेले सुभेदार मेजर पवन कुमार शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळी राजौरीमध्ये गोळीबार केला. या गोळीबारानंतर सुभेदार मेजर आणि त्यांच्या टीमने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार मेजर जखमी झाले. गोळीबारात जखमी झालेल्या सुभेदार मेजर पवन कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पवन कुमार यांनी रुग्णालयात उपचारादम्यान जीव सोडला. सुभेदार मेजर पवन कुमार यांच्या मृत्यूची वार्ता त्यांना कुटुंबीयांना देण्यात आली आहे. डीसी कांगडा हेमराज बैरवा यांनी स्वत: सुभेदार मेजर यांच्या घरी जाऊन वार्ता कळवली. सुभेदार मेजर पवन कुमार यांचं पार्थिव यांच्या गावी आज रात्री पोहोचणार आहे.

India Pakistan tension :
India Pakistan Crisis : दणके सुरुच! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकंट

वडील सैन्यात होते हवालदार

कांगडा जिल्ह्यातील शाहपूर नगर पंचायतच्या वार्ड नंबर ४ च्या नगरसेवक शुभम यांनी सांगितलं की, '४९ वर्षीय पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळाली. पवन कुमार हे २५ पंजाब रेजिमेंट होते. ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्याआधी देशासाठी शहीद झाले. पवन कुमार यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पवन यांचे वडील गरज सिंह सैन्य दलात हवालदार होते.

India Pakistan tension :
Big Weather Update : आला रे आला मान्सून आला! केरळमध्ये वेळेआधीच धडकणार, महाराष्ट्रात या तारखेला पाऊस कोसळणार

पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी शोककळा पसरली. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी लोकांची येजा सुरु झाली आहे.पवन कुमार यांच्या शहीद होण्याच्या बातमीने त्यांच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पवन कुमार यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे. पवन कुमार यांच्या आईचं नाव किशो देवी आहे. तर २३ वर्षीय मुलाचं नाव अभिषेक आहे. तर मुलीचं नाव अनामिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com