Big Weather Update : आला रे आला मान्सून आला! केरळमध्ये वेळेआधीच धडकणार, महाराष्ट्रात या तारखेला पाऊस कोसळणार

Big Weather Update In Marathi : केरळमध्ये मान्सून वेळेआधीच धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस वेळेआधीच बरसण्याची शक्यता आहे.
Big Weather Update In Marathi
Weather Update Saam tv
Published On

उकाड्याने त्रस्त झालेल्यांना दिलासादायक माहिती हाती आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून पाच दिवस आधीच केरळात धडकण्याची शक्यता आहे. केरळात मान्सून २७ मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनचं केरळात साधारणपणे १ जूनपर्यंत आगमन होतं. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून अपेक्षेआधी केरळात धडकला, तर २००९ सालानंतर दुसऱ्यांदा मान्सून भारतात वेळेआधी धडकणार आहे. २००९ साली पावसाचं आगमन २३ मे रोजी झालं होतं.

मान्सून केरळ राज्यात साधारणपणे १ जूनपर्यंत धडकतो. ८ जुलैनंतर संपूर्ण भारत देशात पावसाला सुरुवात होते. १७ सप्टेंबरनंतर उत्तर-पश्चिम भारतातून पाऊस परतण्यास सुरुवात होते. पाऊस १५ ऑक्टोबरनंतर पूर्णपणे परततो. आयएमडीने एप्रिलमध्ये २०२५ च्या मान्सूनसाठी एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. तर भारताच्या उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाशी संबंधित एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारली होती.

Big Weather Update In Marathi
India Pakistan Crisis : दणके सुरुच! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकंट

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी म्हटलं की, 'भारतात किमान चार महिने (जून ते सप्टेंबर) सामान्य स्वरुपात पावसाची शक्यता असते. यंदा मान्सूनचं आगमन होण्याआधीच अवकाळी पावसाने कहर केल्याचं पाहायला मिळालं. मागील काही आठवड्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे दिल्लीसहित काही भागात वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील पाच दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Big Weather Update In Marathi
Maharashra Politics : काँग्रेसला फोडा अन् रिकामी करा; महायुती सरकारच्या बड्या मंत्र्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

महाराष्ट्रात कधी ?

केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारण ७ जूनपर्यंत आगमन होते. हवामान विभागाच्या दाव्यानुसार, मान्सून तीन दिवस आधीच केरळात दाखल झाला, तर महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच येण्याची मोठी शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून ४ ते ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com