
सुप्रीम मस्कर, साम टिव्ही
केवळ हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम करून भारत थांबणार नाहीये तर पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत आता पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे.हा स्ट्राईक प्रत्यक्षात आणणार आहे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ.ऑपरेशन सिंदूरची विजयगाथा ते जगभरात पोहोचवणार आहेत. पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाकेबंदी करण्यासाठी आणि पाकचे कारनामे जगासमोर मांडण्यासाठी या शिष्टमंडळात कोणकोण असणार आहे पाहूयात.
या दौऱ्यादरम्यान खासदारांचे आठ गट अमेरिका, ब्रिटनसह ६ देशामध्ये जाऊन भारताची भूमिका मांडतील. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद जपानला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं तर अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर करणार आहेत.
भारतानं खासदाराचं शिष्टमंडळ पाठवताना सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिलयं. यामुळे भारताच्या एकजूटूची ओळख तर जगाला होणारच आहे पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी साध्य होतील. पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं आणि पाकिस्तानकडील अणुबॉम्ब असुरक्षित नसल्यानं त्याच्यावर नियंत्रण आणावं या भारतानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवरही या भेटीदरम्यान शिक्कामोर्तब होणार आहे. हा डिप्लोमॅटिक स्ट्राईक म्हणजे केवळ आंतराराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवून केवळ पाकची नाकेबंदी नसेल तर यातून भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वच देशांना एक इशारा असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.