CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

INDIA Alliance Meeting: CJPआंदोलन चालू असताना राहुल गांधींनी दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीचे नेते आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष आपला दबाव वाढवत असून संबंधित मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
Published On
Summary
  • राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे.

  • सोनिया गांधी, सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत.

  • CJP आंदोलन आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'इंडिया' (INDIA) आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही खासदारांची बैठक होतेय. हाती आलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि आरजेडीच्या खासदार मीसा भारती या बैठकीसाठी राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत.

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
Protest : काँग्रेसविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याही राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. बैठकीसाठी राहुल गांधीही आपल्या निवासस्थानी दाखल झालेत. यापार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 'नीट' (NEET) परीक्षा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या आघाडीतील लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या बैठकीला उपस्थित राहिलेत.

नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्षांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन विस्कळीत होत आहे. विरोधक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत. दुसरीकडे नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे, कारण नव्या चर्चेच्या स्थळावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालयांची घोषणा केली आहे.

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
सरकारकडून २४ तासात ४ वेळा प्रस्ताव; नड्डांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होणार चर्चा, CJPकडून मात्र नकार

सरकारने चर्चेसाठी तयार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आणि आंदोलकांना केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात चर्चेसाठी आमंत्रित केले. मात्र, सीजेपीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि कोणतीही बैठक जंतर मंतरवर किंवा परस्पर संमतीने ठरवलेल्या तटस्थ ठिकाणीच व्हावी, असा आग्रह धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com