साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Nuh accident latest news : हरियाणातील नूह येथे साखरपुड्याहून परतणाऱ्या तरुणांच्या इको कारला ट्रॅक्टर-ट्रॉलीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनिल, विवेक आणि रवी या तिघांचा मृत्यू झाला.
Nuh accident latest news
Nuh accident latest news
Published On: 

Haryana road accident today : साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून आनंदात घराकडे परतणाऱ्या तरुणांवर काळाने भीषण घाला घातला आहे. एका भरधाव ट्रॅक्टर-ट्रॉलीने कारला दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे कारमध्ये फसलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अखेर पोलिसांना घटनास्थळी 'जेसीबी' (JCB) बोलवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हरियाणातील नूह येथे शनिवारी रात्री उशिरा झालेलया भीषण अपघातात ३ तरूणांचा जागीच मृत्यू झाला. फिरोजपूर झिरका येथील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर परतणाऱ्या तरुणांना घेऊन जाणाऱ्या कारला भरधाव वेगातील ट्रॅक्टर-ट्रॉलीने जोरात धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आणि मृतदेह आत अडकले होते. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अनिल, विवेक आणि रवि.. अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत.

Nuh accident latest news
१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

भीषण टक्कर, गाडीचे तुकडे तुकडे झाले.

प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही तरुण फिरोजपूर झिरका येथील एका साखरपुड्याच्या समारंभाला हजेरी लावून घरी परतत होते. एका अनियंत्रित ट्रॉलीने त्यांच्या इको कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ट्रॉली चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर गाडीची अवस्था इतकी वाईट झाली होती की मृतदेह बाहेर काढणे अशक्य होते. पोलिसांनी आणि स्थानिक रहिवाशांनी बुलडोझर बोलावला आणि तीन मृतदेह बाहेर काढले.

Nuh accident latest news
४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

पोलिसांनी आरोपी ट्रॉली चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अपघातामागील कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. रवी हा गुरुग्राममधील फिरोज गांधी कॉलनीचा रहिवासी असून त्याचे वय २८ वर्षे होते. अनिल (२६) हा सोहना येथील राम मंदिरचा रहिवासी होता आणि चालक विवेक हे देखील सोहनाचेच होते. ते फिरोजपूर झिरका येथे संजयच्या मुलाच्या साखरपुड्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com