

Maharashtra farmer relief scheme latest news : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत थेट जमा केली जाणार आहे. यासाठी कोणतीही किचकट ई-केवायसी करण्याची गरज उरलेली नाही. ४ नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा विश्वास कृषीमंत्र्यांनी सकाळसोबत बोलताना व्यक्त केला आहे.
दिवाळीआधी जमा होणारी ५ हजार रूपयांची मदत राज्यातील ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 'अॅग्रीस्टॅक' क्रमांकावरून शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या मदतीसाठी शेतकऱ्यांना वेळखाऊ व किचकट 'ई-केवायसी' करण्याची गरज नाही. यामुळे मदत मिळण्यात शेतकऱ्यांना कोणताही विलंब होणार नाही. पंचनामे करतानाच प्रत्येकाचा अॅग्रीस्टॅक क्रमांक व बँक खात्याची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असा ठाम विश्वास कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असून, ही रक्कम थेट खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील कॅबिनेट बैठकीनंतर हे जाहीर केले असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय पुढच्या आठवड्यात निघेल, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच, केंद्राच्या आपत्ती निवारणातून (NDRF) निधी प्राप्त झाल्यावर बाकीची नुकसान भरपाई वितरीत केली जाणार आहे. सध्या शासनाने प्रत्येक विभागाच्या निधीला २० टक्क्यांची कात्री लावली असून, तो निधी दुष्काळाची मदत व दुष्काळ निवारणासाठी वापरला जाणार असल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.