Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्ता ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ सरकारने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश
Gyanesh KumarSaam Tv
Published On: 
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार

  • केरळ सरकारकडून चौकशीचे आदेश

  • ज्ञानेश कुमार यांच्या २००६ सालच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी

  • ज्ञानेश कुमार केरळ PWD सचिव असतानाचे आहे हे प्रकरण

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सीजेपीच्या आंदोलनानंतर आज मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळ सरकारने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशभरात याची चर्चा होऊ लागली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यावरील २० वर्षे जुने एक मोठे प्रशासकीय आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्यावरील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांची दक्षता चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश
Who Is Gyanesh Kumar: नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत? राम मंदिराशी आहे कनेक्शन

ज्ञानेश कुमार यांच्या चौकशीचे आदेश दिलेले हे प्रकरण २००६ चे आहे. १९८८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची केरळ सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी 'मलयनकिझू वेणुगोपाल' यांनी नवीन तक्रार दाखल केल्यानंतर केरळ सरकारने मोठ पाऊल उचलत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश
Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

मलयनकिझू वेणुगोपाल यांनी केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, ज्ञानेश कुमार यांनी २००६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असताना केरळ राज्य परिवहन प्रकल्पाअंतर्गत रस्ते बांधणीची कंत्राटे देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गुन्हेगारी गैरवर्तन केले होते. हे प्रकरण केवळ आर्थिक अनियमिततेपुरते मर्यादित नसून, त्यात एका परदेशी नागरिकाच्या संशयास्पद आत्महत्येचाही समावेश आहे.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश
Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

वाद वाढल्यानंतर, २००६ मध्ये वाद संपण्यापूर्वी ज्ञानेश कुमार यांना सार्वजनिक बांधकाम सचिव पदावरून हटवून त्यांची बदली करण्यात आली. त्यावेळी प्राथमिक चौकशी करण्यात आली होती पण तक्रारदाराचा आरोप आहे की, कोणताही तार्किक निष्कर्ष न काढता दबावाखाली आधीची चौकशी बंद करण्यात आली होती. आता ही चौकशी परत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश
Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com