Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

Gyanesh Kumar latest news : मतचोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली.
Gyanesh Kumar latest news
Gyanesh Kumar latest news
Published On: 

Gyanesh Kumar resignation : मतचोरीविरोधात देशभरातील विरोधक एकवटले आहेत. आज दिल्लीत 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला २० पेक्षा जास्त विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या बैठकीत निवडणूक आयोगाविरोधात सर्वांचाच आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी संताप व्यक्त करत पुढील आंदोलनाची दिशा कशी असेल, याबाबत माहिती दिली.

१ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत 'इंडिया' आघाडीकडून आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये सर्व खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक झाल्या. "ज्ञानेश कुमार चोर-डाकू आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा," असा घणाघाती हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या? काय म्हणाल्या?

'इंडिया' आघाडी एकत्र आहे, एकसंध आहे आणि आम्ही सगळे सोबत आहोत. मतचोरीचा हा सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे, तो अत्यंत गंभीर आणि घाणेरडा प्रकार आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मतचोरीचा जो मुद्दा उठवला होता—ज्या मतचोरीच्या जोरावर भाजप २०२६ च्या निवडणुकांमध्ये जिंकली, मध्य प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये जिंकली, अन् बंगालमध्ये तर त्यांनी पूर्णपणे लुटालूट केली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

Gyanesh Kumar latest news
48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार
Gyanesh Kumar latest news
IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आमची तक्रार घेऊन इथे आलो होतो. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो, सर्व दरवाजे ठोठावले. पण आता हे स्पष्ट झाले आहे की ज्ञानेश कुमार चोर आहेत, डाकू आहेत. त्यांनी मतांची चोरी केली, ईव्हीएम (EVM) मशीन जाळल्या, ईव्हीएम हायजॅक केल्या... त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री म्हणाल्या.

आपल्याला लोकशाही वाचवावी लागेल. मतदानाचा अधिकार हा आपला घटनात्मक अधिकार आहे... जर लोक मतदानच करू शकणार नसतील आणि निवडणुकांमध्ये असा घोटाळा होणार असेल, तर देश कुठे जाईल?... ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर हे आंदोलन खूप पुढे जाईल... आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल. त्यांनी मतांची लूट केली, चोरी केली. ईव्हीएम मशीन का जाळल्या गेल्या?..." असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Gyanesh Kumar latest news
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

ज्यांनी लोकशाही उद्ध्वस्त केली त्यांना शिक्षा होईल - राहुल गांधी

"आज इंडिया आघाडीच्या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली. देशात मतांची चोरी झाली आहे. ज्या लोकांनी भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली आहे, त्यांना शिक्षा होईलच, हे सर्व विरोधी पक्षनेते मिळून सुनिश्चित करतील. मग ते कितीही वरिष्ठ असोत किंवा कोणीही असोत, त्याने काही फरक पडत नाही; कारण भारतीय लोकशाही या देशातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

बैठकीत सर्वांची हीच भावना होती की, निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लोकशाही नष्ट केली आहे, हे पटवून देण्यात विरोधी पक्ष देशातील लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, विरोधाची एक नवी लाट निर्माण झाली आहे. भारतात जे काही चालले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि ते वेळेतच थांबवले पाहिजे, ही भावना आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे." असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com